( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी: संतोष पाटील )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१५ जानेवारी बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवक सप्ताहाच्या निमित्ताने शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अमळनेर नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने स्वच्छतेचा संदेश दिला. शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुतळ्यांची देखभाल आणि स्वच्छता ही स्थानिक प्रशासन व सामाजिक संघटनांसाठी नेहमीच एक महत्त्वाची बाब राहिली आहे. पुतळ्यांवर साचलेली धूळ व घाणीचे थर काढून त्यांना नवे रूप देण्यात आले.यावेळी अ.भा.वि.प अमळनेर शहर मंत्र्यांनी सांगितले की, "युवक सप्ताहाच्या निमित्ताने हा स्वच्छता उपक्रम केवळ स्वच्छता राखण्यासाठी नाही तर तरुणांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे."नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, "शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचेच काम नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे."हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडताच अमळनेर शहरातील नागरिकांनी अ.भा.वि.प आणि नगर.प यावेळी शहर मंत्री धिरज माळी, सह शहर मंत्री आदित्य चौधरी, जयेश सोनवणे,गौरव नाद्रें,इतर कार्यकर्ते व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
=========================================

