( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१५ जानेवारी बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडून तहसील कार्यालयात जमा केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातूनचोरीस गेल्याची घटना मकरसंक्रांतीला घडली आशिष पारध्ये यांनी फिर्याद दिली की त्यांनी३१डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता रणाईचे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९बीजी ९०२० व बिना नंबरची ट्राली पकडली होती आणि हे ट्रॅक्टरतहसील आवारात जमा केले होते. ट्रॅक्टर चालक संदीप सुभाष भिल व मालक सचिन संचिलाल भिल दोन्ही रा मोहाडी आहेत. ट्रॅक्टर मालकाला तहसील कार्यालयात बोलावून त्यालादंडाची नोटीस देण्यात आली होती. मात्र त्याने दंड न भरल्यानेट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा होते.१४ जानेवारीला लिपिक जगदीश पाटील यांना ट्रॅक्टर दिसून न आल्याने त्यांनी तलाठी आशिष पारध्ये याना सांगितले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशाने अमळनेर पोलिसात दीड लाखाचे ट्रॅक्टर आणि १३हजार ३२६ रुपयांची वाळू असे एकूण १लाख ६३ हजार ३२६रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल केला. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत
========================================


