⭕ *आधार संस्थेची तक्रार बालविवाह थांबवण्यात महसूल विभागाचे यश...*🔘




( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२१ जानेवारी मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील बालविवाह थांबवण्यासाठी सामाजिक काम आहे अमळनेर येथील बोरसे गल्ली येथील विवाह होत असताना आधार संस्थेची तक्रार आल्यावर अंमळनेर उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी नितीन कुमार मुंडावारे यांनी महसूल विभागातील कर्मचारी प्रशांत धमके यांच्या पथकासह उप पोलीस निरीक्षक पिंगळे  पोलीस निरीक्षक   विकास देवरे यांच्या सहकारी व पोलीस कर्मचारी बालविवाह थांबवण्यासाठी बोरसे गल्ली येथे गेले असता पुढील तपास सत्य काय आहे ते जाण्यासाठी गेलेले अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी योगिता चौधरी संरक्षणाधिकारी ज्ञानेश्वरी पाटील आधार संस्थेचे कर्मचारी घटनास्थळी बोरसे गल्ली येथे जाऊन चौकशी करून सत्य काय आहे बालविवाह थांबवण्यासाठी ज्या मुलीला शिक्षण घेण्याचे वय आहे त्याच वयात तिला विवाह करण्यास आपल्या परिवाराकडून सहकार्य मिळत आहे सामाजिक कार्य करणारे संस्था यांच्या माध्यमातून मुलींबद्दल शिक्षणाची शासनाकडून वेळोवेळी जनजागृती होत असते काही बालविवाह थांबवण्यास अमळनेर महसूल विभागाकडून आधार संस्थेचे प्रमुख रेणुका वाघमारे यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांना तक्रार देऊन बालविवाह थांबवण्यास खूप मोठे यश आले आहे ज्या शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन मिळत असते त्याच वयात संसाराचे ओझे पेलण्याचे काम पालक वर्ग करत आहे आपल्या मुलीला संसाराच्या ओझे देऊन विवाह करत आहे बोरसे गली येथे हा विवाह थांबवण्यात आल्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी नितीन मुंडवारे यांनी आपल्या पथकासह व आधार संस्था यांच्या सहकार्याने हे यश मिळाले असून असे प्रकार घडू नये म्हणून पालक वर्ग यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे या बालविवाह रोखण्याचे सर्वात मोठे यश आधार संस्था प्रमुख यांचे सहकार्य लाभले आहे...

========================================

Post a Comment

0 Comments