( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२० जानेवारी सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलश यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वागतासाठी उद्या दि 21 जाने रोजी नियोजन बैठकीचे आयोजन.सविस्तर वृत्त असे की,दि ३१ जुलै १९३७ रोजी व १७, १८, १९, जुन ११३८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी, ता. शिरपूर येथील बैल पोळ्याच्या केस संदर्भात तात्कालिक जिल्हा न्यायदंडाधिकारी पश्चिम खान्देश अर्थात आजचा धुळे जिल्हा येथे अपिलावर कामकाज करण्यासाठी आले होते. त्यावेळी धुळेकर जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्टेशन पासून ते ट्रैव्लर्स बंगला म्हणजे आत्ताची संदेश भुमी पर्यत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धुळेकर जनतेला पहिल्यांदा संदेश दिला.सर्व उल्लेख महाराष्ट्र शासन द्वारा प्रकाशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ मध्ये छापून आला आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भुमीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉ.बाबासाहेब आंबेड़कर संदेश भूमी बहुउदेशीय संस्था धुळे च्या वतीने त्याग मुर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी-मुबई, चैत्य भुमी दादर मुंबई ते डॉ.बाबासाहेब आंबेड़कर संदेश भुमी धुळे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा दि.७ फेब्रुवारीर २०२५ रोजी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यागमुर्ती रमाई स्मारक वरळी, मुंबई येथुन सुरवात होणार आहे तसेच दि.२३/०२/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी धुळे बसस्थानका जवळ बौद्ध परिषद होऊन समारोप होणार आहे. तरी सदर संदेश यात्रा ही त्यागमुर्ती रमाई स्मारक, वरळी, मुंबई, चैत्यभूमी दादर, घाटकोपर,ठाणे,भिवंडी, शहापूर, कसारा, इगतपुरी, घोटी, नाशिक, ओझर,पिंपळगांव, चांदवड, मालेगांव, चाळीसगांव भडगांव, पाचोरा,जळगांव, पाळधी, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगांव, चोपडा,शिरपूर, नरडाणा, शिंदखेड़ा, दोडाईचा, शहादा, प्रकाशा,तळोदा,नंदुरबार, खांडबारा, विसरवाड़ी, नवापूर, साकी या मार्गाने संदेशभूमी धुळे येथे बौध्द परिषद होऊन समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे तरी या मार्गावरील तमाम बौद्ध बांधवांनी मोठधा संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश संदेश यात्रा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती,धुळे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळेच्या वतीने करण्यात आली आहे.सदर ची अस्थीकलश संदेश यात्रा दि १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर शहरात आगमन होत असल्याने तिच्या स्वागतासाठी च्या नियोजनासाठी तालुक्यातील सर्व सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची बैठक " उद्या दिनांक २१ रोजी सायंकाळी ५ वाजता,प्रबुद्ध विहार,स्टेशन रोड " येथे होणार असल्याने सर्व समाज बांधवांनी सदरच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश संदेश यात्रा नियोजन समितीने केले आहे.
========================================
================================================================================
========================================
========================================
========================================
========================================
================================₹=======












