⭕ *श्रमदान मोहिम राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला...*🔘




 ( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२५ जानेवारी शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आज राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम ,अमळनेर येथील माननीय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, पोस्टर/ चित्रकला स्पर्धा पथनाट्ये सादरीकरण श्रमदान मोहीम असे कार्यक्रम उत्साहात पार पडले. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, रूक्मिणी ताई महिला महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय अमळनेर तसेंच एन एम पाटील महाविद्यालय मारवड,येथील विद्यार्थी सहभागी होते.समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी परिसरात श्रमदान मोहीम राबविली. याप्रसंगी समाज कार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी आणि टीम यानी पथनाट्य सादर केले.महिला महाद्यालयाच्या टीम ने पथनाट्य सदर केले.प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसिलदार प्रशांत धमके, नितीन ढोकणे यांचेसह कर्मचारी यांची उपस्थिती होती. सहभागी सर्व विदयार्थी, प्राध्यापक यांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.  विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

============≈===========================

Post a Comment

0 Comments