( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२५ जानेवारी शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक, आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. सदर बैठकीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष बी.के.सूर्यवंशी यांनी केले. त्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या आदेशानुसार, आज "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्यात येत आहे. मतदार म्हटलं म्हणजे मतदान आले, आणि मतदान म्हणजे निवडणूक आलीच. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात, निवडणुका या मुक्त व निपक्षपातीपणे होणे गरजेचे, महत्त्वाचे आहे. व ते काम कायदेशीर रित्या निवडणूक आयोग करतो. परंतु मागील विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता, निवडणूक आयोगाचे काम आश्चर्यकारक व अविश्वासनीय असल्याचे दिसते. कारण प्रथम लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले. आणि सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकात, सत्ताधारी पक्षास आश्चर्यकारक बहुमत मिळाले. सहा महिन्यातच लोकांच्या मतांचे एवढे परिवर्तन झाले? तसेच विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेने 50 लाख मतांची वाढ कशी झाली? विधानसभे चया निवडणूकित संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी मतदानाची जाहीर झालेली आकडेवारी, यात 76 लाख मतदान कसे वाढले?अश्या अनेक प्रश्नांमुळे, विधानसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. ह्या "राष्ट्रीय मतदान दिन" निमित्ताने सांगावेसे वाटते की, निवडणूका पारदर्शक, निपक्षपातीपणाने, पार पडल्या पाहिजेत. तसेच लोकशाहीचा, मतदारांचा, आदर, सन्मान, ठेवून निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पार पाडली पाहिजे. असे सूर्यवंशी यांनी प्रस्तावित केले. एड. रज्जाक शेख यांनी विचार मांडले. त्यानंतर प्रा. श्याम पवार यांनी राज्य परिवहन महामंडळाची भाडेवाढ ही जाचक असून, भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. असा ठराव मांडला. मध्यंतरी राज्यातील, देशातील या परिस्थितीवर शांतापूर्ण मार्गाने बदल घडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे" जय बापू" "जय भीम" "जय संविधान" वर चर्चा झाली. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जय बापू, जय भीम, जय संविधान चे नारे लावले, घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयात मा. तहसीलदार अंमळनेर यांना निवेदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज पाटील व आभार श्री गजानन साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमात श्री गोकुळ बोरसे, तुषार संधान शिव, शरद पाटील, सुखदेव होलार, अशोक दाजाभाअमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक, आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. सदर बैठकीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष बी.के.सूर्यवंशी यांनी केले. त्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या आदेशानुसार, आज "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्यात येत आहे. मतदार म्हटलं म्हणजे मतदान आले, आणि मतदान म्हणजे निवडणूक आलीच. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात, निवडणुका या मुक्त व निपक्षपातीपणे होणे गरजेचे, महत्त्वाचे आहे. व ते काम कायदेशीर रित्या निवडणूक आयोग करतो. परंतु मागील विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता, निवडणूक आयोगाचे काम आश्चर्यकारक व अविश्वासनीय असल्याचे दिसते. कारण प्रथम लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले. आणि सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकात, सत्ताधारी पक्षास आश्चर्यकारक बहुमत मिळाले. सहा महिन्यातच लोकांच्या मतांचे एवढे परिवर्तन झाले? तसेच विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेने 50 लाख मतांची वाढ कशी झाली? विधानसभे चया निवडणूकित संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी मतदानाची जाहीर झालेली आकडेवारी, यात 76 लाख मतदान कसे वाढले?अश्या अनेक प्रश्नांमुळे, विधानसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. ह्या "राष्ट्रीय मतदान दिन" निमित्ताने सांगावेसे वाटते की, निवडणूका पारदर्शक, निपक्षपातीपणाने, पार पडल्या पाहिजेत. तसेच लोकशाहीचा, मतदारांचा, आदर, सन्मान, ठेवून निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पार पाडली पाहिजे. असे सूर्यवंशी यांनी प्रस्तावित केले. एड. रज्जाक शेख यांनी विचार मांडले. त्यानंतर प्रा. श्याम पवार यांनी राज्य परिवहन महामंडळाची भाडेवाढ ही जाचक असून, भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. असा ठराव मांडला. मध्यंतरी राज्यातील, देशातील या परिस्थितीवर शांतापूर्ण मार्गाने बदल घडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे" जय बापू" "जय भीम" "जय संविधान" वर चर्चा झाली. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जय बापू, जय भीम, जय संविधान चे नारे लावले, घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयात मा. तहसीलदार अंमळनेर यांना निवेदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज पाटील व आभार श्री गजानन साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमात श्री गोकुळ बोरसे, तुषार संधान शिव, शरद पाटील, सुखदेव होलार, अशोक दाजाभा ऊ,डॉ. रवींद्र पाटील, प्रताप नगराज पाटील. भिवसन बाबा, कन्हैयालाल कापडे, रोहिदास सुका पाटील, शालिग्राम पुंजू पाटील, प्रवीण जैन, श्रीराम पाटील, भगवान संधान शिव, राजू भाट इ. उपस्थिती होती. ऊ,डॉ. रवींद्र पाटील, प्रताप नगराज पाटील. भिवसन बाबा, कन्हैयालाल कापडे, रोहिदास सुका पाटील, शालिग्राम पुंजू पाटील, प्रवीण जैन, श्रीराम पाटील, भगवान संधान शिव, राजू भाट इ. उपस्थिती होती.
=========================================

