⭕ *अवैध वाळू उपसा बंद करून वाळू माफिया यांच्यावर कारवाई करणे अन्यथा धाडस संघटनेच्या वतीने त्रिव आंदोलन..:-अरविंद नाईकवाडी*🔘




(सोलापूर/मंगळवेढा ता.प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ सोलापूर / मंगळवेढा ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२१ जानेवारी मंगळवार :सोलापूर  जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील .बठाण. मल्लेवाडी. उचेठाण. सिद्धेवाडी. मारापुर. तांडूर या गावातून भीमा नदी व माण नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा वाळू राजरोसपणे उपसली जात आहे भीमा नदीतून व माण नदीतून दररोज २०० ते ३०० हायवा टिपर वाळू उपसली जाते बठाण मध्ये टेंडरच्या नावाखाली अवैध वाळू उपसा चालू आहे काही दिवसापूर्वी मंगळवेढा मध्ये वाळू माफिया यांच्या हातून एका पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि पंढरपूर मधील प्रशासनातील ऑडिओ संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर मंगळवेढा त पुन्हा वाळू माफिया यांनी तोंड वर काढले आहे...याबाबत संघटनेने महाराष्ट्राचे मुख्य मंत्री.मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य,मा श्री महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य,मा श्री जिल्हाधिकारी साहेब सोलापूर,मा श्री प्रांताधिकारी साहेब मंगळवेढा,मा श्री तहसीलदार साहेब मंगळवेढा,याना ऑनलाईन फरियाद दिली आहे.तातडीने वाळू माफिया यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या बाहेर धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने त्रिव आंदोलन आपल्या मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या बाहेर करण्यात येईल..यांची संपूर्ण जवाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार व जवाबदार तंत्र आणी जबाबदार अधिकारी यांची राहणार नोध घ्यावी...

========================================

Post a Comment

0 Comments