⭕ *सक्सेस अकॅडमी क्लासेस बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला...*🔘

 



   

   ( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी:- संतोष पाटील)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ जानेवारी रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पवन पाटील सरांची सक्सेस अकॅडमी क्लासेस मधील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं, मित्रमंडळींनी आपापल्या आवडत्या कार्यक्रमावर आपले लक्ष केंद्रित करून, आपला निरोप समारंभ कार्यक्रमातून वर्षभराचा अभ्यासाची चांगल्या प्रकारे होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला जाण्याची तयारीच मनोगत व्यक्त केले, तसेच अनेक नृत्य कार्यक्रम करून, डान्स कॉम्पिटिशन, व कार्यक्रम घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ तसेच मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न करण्यात आला, आज  ता,19/01/2025 रोजी, वार रविवार, स्थळ लोकमान्य टिळक जुना टाऊन हॉल अमळनेर येथे पवन पाटील सरांच्या सक्सेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभासाठी लाभलेले  मान्यवर व त्यांचं योग्य ते मार्गदर्शन प्रमुख उपस्थितीत पाहुणे म्हणून..


 मा, न्यायाधीश श्री गुलाबरावजी पाटील साहेब, अमळनेर तालुक्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील बहुचर्चित मुंदडा बिल्डर्स अमळनेर तालुक्याचे नाव जिल्ह्यात एक नंबर वर नेण्यास आपला खारीचा वाटा असणारे आपले सर्वांचे आवडते नेहमी सर्वांना आपलेसे करणारे हसतमुख स्वभावाचे भाऊसो ओमप्रकाश मुंदडा, स्वामी विवेकानंद हायस्कूल चेअरमन साहेब श्री मा, विवेकानंदजी भांडारकर सर, अमळनेर तालुक्यातील आपल्या अग्रेसर भूमिकेवर ठाम असणारे सामाजिक कार्यकर्ते, श्री संतोष पाटील, भारत जागृत मंच अध्यक्ष, तसेच श्री नाना अभिमन पाटील, श्री धनगर सर, यश पंढरी क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील सर, श्री गौरव धनगर सर,वरील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीचा मार्ग दाखवत अभ्यासाच्या जोरावर आपण सर्व गोष्टी जगात घेऊ शकतो, आणि शाश्वत मार्गाने समाजाला आपण काही देणं लागतो, असे आपल्या योग्य त्या अभ्यासाच्या जोरावर सर्वांना योग्य त्या मार्गावर आपण नेऊ शकतो, असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केले श्री, आदरणीय न्यायाधीश साहेब तसेच ओम प्रकाश मुंदडा, विवेक जी भांडारकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन देशातील भावी पिढी निर्माण व्हावी, आपला देश योग्य त्या भावी पिढीचे आधारावरती उंच उंच प्रगतीपथाच्या भरारी घ्यावा, असे प्रतिपादन श्री अमोल पाटील सर नाशिक, सोबतच भूषण वाणी सर जळगाव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत सर्व मान्यवरांनी आपले म्हणणं थोडक्यात मांडणी करून सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींनी स्वतःला कमजोर न समजता आपण आपल्या बुद्धीच्या बळावर योग्य त्या परीक्षांना सामोरे जावं, कुठेही आपल्या मनात संकोच न ठेतांना आपण आपल्या परिवार सोबत एक निष्ठेने व आदराने वागून, आई-वडिलांच्या चरणी नम्रतेने मस्तक ठेवून दररोज आपल्या महाविद्यालयाचा आदर करून आपल्या आई-वडिलांसमवेत आपल्या देश हिताचे स्वप्न पूर्ण करून, आपलं नाव लौकीक कराव,अशा भावना वरील सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या विचारातून प्रेरणा दिल्यात व मार्गदर्शन केले,तसेच वरील सर्व मान्यवरांचे स्वागत करून जाहीर आभार मानले,सूत्रसंचालन सक्सेस अकॅडमीचे संचालक, पवन पाटील सर यांनी केले...

========================================

=========================================

=========================================
=========================================
=========================================

=========================================

=========================================



Post a Comment

0 Comments