⭕ *प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते..!*🔘


( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी :- संतोष पाटील )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ जानेवारी सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप कौलेज येथुन धनंजय व गौरव यांस गौरव करून सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान! गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले या संमेलनात साहित्यिक मुलाखत हा विषय प्रताप महाविद्यालयाने जाहीर केला होता, त्यात अनेक संघातील प्रथम विजेते प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र पदविधर निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांना सात हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वैष्णवी पाटील, प्राची पाटील द्वितीय तर तेजस्विनी कोठावदे, दिशा महाजन यांना तृतीय क्रमांक मिळाला. निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांनी डॉ रविंद्र शोभणे, कवि अशोक कोतवाल, राजेंद्र कांबळे, डॉ रंजन गर्गे, देविदास फुलारी यांची प्रकट मुलाखत घेतली होती. ह्या मुलाखती परीक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते प्रथम विजेते ठरले.प्रथम विजेते निर्भय सोनार व गौरव पाटील यांना डॉ नितीन पाटील, प्रा योगेश पाटील, ऍड. सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ विजय तुंटे, डॉ संदीप नेरकर, प्रा तोरवणे, प्रा अवीत पाटील, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. विलास गावित, हेमंत पवार, डॉ शशिकांत सोनवणे, आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.सांघिक विजेते निर्भय सोनार व गौरव पाटील यांचे डॉ डिगंबर महाले, सतीश देशमुख, संदीपराजे घोरपडे, डॉ. जी.एम. पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. अनिल शिंदे, प्रा. लीलाधर पाटील, ऍड एस आर पाटील, दिलीप सोनवणे, निबंधक इंद्रवदन सोनवणे, सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवानी अभिनंदन केले.

=========================================

Post a Comment

0 Comments