(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ मार्च बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरीत चि. योगेश मनोहर साळुंके ( नगर रचना सहायक गट ब- क्लास २ अधिकारी ) म्हणून यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा मुस्लिम समाजा कडुन सत्कार करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करतांना स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरीचे अध्यक्ष-मौलाना रियाज़ शेख हे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघीनी चे दुध आहे,"शिका संघठित व्हा आणि संघर्ष करा", संघठित व्हा म्हणजे कुणी संघठित व्हायचं ? ज्यांच्यावर अन्याय होतो. त्यानी संघठित व्हायला हवं तुम्ही एकटे अन्याय दूर करूं शकणार नाही, त्यासाठी म्हणुन ज्यांच्यावर अन्याय होतो,ते एक व्हा,त्यांची एकजुट करा. इल्म रौशनी है ज़ीहालत अंधेरा है, शिक्षणाचा महत्व काय आहे हे पटवुन दिले आई वडिलांचा सम्मान करा आदर करा व्यसन मुक्त व्हा आपल्या देशाचे नाव लौकीक करा आपल्या परिसरातील स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण तय्यार करा,एक रोटी कम खाओ अपने बच्चों को पढ़ाओ असे संदेश मौलाना रियाज़ शेख यांनी दिले, त्या नंतर सत्कार मूर्ति योगेश साळुंके आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि माणसासाठी कोणतीही गोष्ट अवघड नाही जर प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट शक्य होते..."कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है", डॉ बाबासाहेबांच एक वाक्य आहे.ते म्हणतात जर तुमच्याकडे दोन रुपए असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या.वाचनाला एवढं महत्व देणारे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजलेत का ? हा प्रश्न निर्माण होतो.असे योगेश साळुंके हे म्हणाले...या वेळेस अ.गफ्फार खाटीक, कुदरत अली,हैदर मिस्री, समाजिक कार्यकर्ता मनोज मोरे साहेब, सिद्धांत पाटील, अजिंक्य सांगोंरे, तुषार पाटील, दानिश अली सैय्यद Scrap वाले,समाजिक कार्यकर्ता नावेद शेख, शोशल वर्कर अख्तर अली, समाज वादी पार्टी चे इकबाल कुरेशी, आकिब अली सैय्यद, अल्तमश शेख,राजु काझी,एम आए एम चे सईद शेख, शाहरुख सिंगर, अकरम पठान, मोईज अली, इमरान भाया,रिजवान पठाण,जुनैद पटवे,फारूक खाटीक, कामिल खाटीक, राशिद शेख, अनम पठाण ,फारुख शेख उस्मान, अमजद पेंटर, आकिब शेख, राहील पठान,अरबाज पठाण आदी समाज बांधव उपस्थित होते.
==========================================


