(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:३० मार्च सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खानदेशातील अहिराणी भाषेचा जागर व्हावा या उद्देशाने आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात बळीराजा स्मारकाचे पूजन करून भव्य ग्रंथ आणि अहिराणी सांस्कृतिक दिंडीने करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात (अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी) येथे दिंडीची सांगता झाली.बळीराजा स्मारकापासून सुरुवात झालेल्या या ग्रंथीदिंडीत कानबाई, तगतराव, विठोबाची वारी, ढोलताशांचा गजर, लेझीमच्या नृत्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. आथानी कैरी, तथानी कैरी...कैरी झोका खाय वं... अशा अहिराणी आणि आदिवासी गाण्यांवर रसिकांनी ठेका धरत दिंडीची शोभा वाढविली.
यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, डी. डी. पाटील, के. डी. पाटील, साने गुरुजी महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ अहिराणी साहित्य कृष्णा पाटील, समन्वयक डि. ए. पाटील, बापूराव ठाकरे, मेघा पाटील, वैशाली शेवाळे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, अर्चना राजपूत, बाळासाहेब भदाणे, डॉ. रमेश सूर्यवंशी, निलेश पाटील, प्रा. अशोक पवार, रणजीत शिंदे, प्रा. लिलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते...
=========================================
=========================================
=========================================
=========================================
===========================================












