(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ मार्च शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गांजा तस्करी करणारी टोळी अमळनेर पोलिसांचा जाळ्यात.दिनांक 28/3/2025 रोजी अमळनेर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे अशांना गोपनीय माहिती मिळाल्यास मिळाली की जळोद मार्गे अमळनेर कडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक MH 19 AJ 0223 या वाहनातून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनचे परी. पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांना माहिती दिली. केदार बारबोले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, गणेश पाटील अशांना छापा टाकण्याचे व कायदेशीर प्रक्रिया करण्याची आदेश दिले. छापा कार्यवाही पथकाने सर्व फायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर वकिल ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल समोर स्पीड ब्रेकर जवळ सापळा रचून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन थांबवले. वाहनातील दोन इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांच्या नाव सिताराम वेळू सोनवणे 52 रा. वलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानि.मनोज सोनू पावरा 24 रा. महादेव दोनवाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली परंतु वाहनात मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची पुन्हा कसून बारकाईने तपासणी केली असता वाहनाच्या टप वर गोपनीय पेटी तयार करण्यात आलेली होती व तिला स्क्रू लावून बंद करण्यात आले होते. जेणेकरून कोणाला निदर्शनात येणार नाही अशा पद्धतीने गांजा लपवण्यात आलेला होता. परंतु पोलिसांच्या नजरे मधून वरील इसम गांजा लपवण्यात अपयशी झाले. छापा कारवाई मध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला आहे. ११,३९४००/- रुपये किमतीचा गांजा. ८,००,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक MH१८आज०२२३ एकूण १९,३९,४००/- रुपये किमतीचा मुद्यमान जप्त करण्यात आलेला आहे. छापा कारवाईची संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून वरील आरोपींच्या विरुद्ध अंमळनेर पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक१२३/२०२५ NDPS कायदा कलम ८ ,२० , २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यांच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अमळनेर पोलीस स्टेशन हे करीत आहे. कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासह अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईचा सपाटा संदर्भात परी. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन हद्दीत कुठलाही बेकायदेशीर धंदा करणाऱ्याची गय केली जाणार नाही त्याचे विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आव्हान त्यांनी यावेळी केले...
=========================


