⭕ *बहादरवाडी गावात माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या पदाचा अति गैरवापर करून ग्रामपंचायत ची जागावर अतिक्रमण करून बळकावली...*🔘




(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ एप्रिल गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी गावात बुधवार दिनांक 02/04/2025 रोजी अचानक आलेल्या वाऱ्याचे वादळामुळे बहादरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सरला नाना पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीत आपल्या पदाचा गैरवापर करून अतिक्रमण करून घेतले होते तसेच आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा अति गैरवापर करून ग्रामपंचायत ची जागा बळकावली असून दादागिरीने गावातील रहिवासी एरिया शेजारील ग्रामपंचायत जागावर आपला हक्क दाखवून आपले गुरडोर बांधून रहिवाशांना नाहकच जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून केला जात आहे, शेजारील रहिवासी पत्रकार संतोष पाटील व निंबा पंडित पाटील यांच्या घरावरती काटेरी भाबुळ व सुभाबुळाचे झाड नेहमी डोलत होतं आम्ही प्रत्येक वेळी विनंती केली दरवर्षाला पावसाळा सुरु होण्याचे आधी विनंती केली तरी देखील त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या जोरावर आमचं कोणीच काही करू शकत नाही असा मीजाज मिरवत शेवटी दोघं रहिवाशांच्या घरावर आज बुधवार रोजी 02/04/2025  सायंकाळी झालेल्या वारा वादळ मुळे राहत्या घरावरती काटेरी व सुबाभूळ जातीचे भले मोठे झाड पडून दोघ घरांची  लोक जेवण करीत असताना थोडक्यात जीवित हानी होण्यापासून बचावली दोन्ही रहिवाशांनी असे अनेक वेळा गुरडोर बांधणारे अतिक्रमण धारक यांना सांगितले असुनही तरीदेखील वरून बोलतात आमची बिना कामाची झाड आहेत, परंतु ते आमची आहेत, अशा स्वरूपाची नेहमी वागणूक देऊन आज रोजी झालेल्या घटनेमुळे आपल्यासमोर घरावरती पडलेले झाडांचे पुरावे सहित आम्ही आपल्याला देत आहोत आणि बहादरवाडी गावातील असले माजी ग्रामपंचायत सदस्यांचे स्वतःचे व जवळील भाऊबंदकी मधील मंडळींच्या नावावर ग्रामपंचायत हद्दीत जागा  बळकवणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, आणि यांच्यावर ग्रामपंचायत कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी ही मागणी मी स्वतः रहिवासी संतोष बाबुराव पाटील रा, बहादरवाडी, खोकरपाट ग्रुप ग्रामपंचायत तालुका अमळनेर  बीडिओ अमळनेर तालुका प्रांत साहेबांना विनंती करीत आहोत आमच्या घराचे झालेले नुकसान भरपाई आम्हास मिळावी ही आमची दोघं नुकसान धारक रहिवाशांची मागणी आहे, अन्यथा असे न झाल्यास आमचे दोघं परिवार प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहात, ही आमची कळकळीची नोंद घ्यावी, आम्ही नेहमी दोघ  रहिवाशांनी वारंवार ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायतीचे दुर्लक्षित धोरणामुळे आज आमच्या घरावर धोक्याची वेळ आलेली आहे, तरी तेथील काटेरी व निकामी झालेली झाडं ग्रामपंचायतीने आपल्या स्वतः कळचा अधिकार वापरून रहिवाशांकडे लक्ष देऊन तेथील विना कामाची झाडे काढण्यास कुठलीही हरकत नाही, व ते गल्लीतील दोन्ही तिन्ही रहिवाशांना धोकेदायक असून तेथून ताबडतोब विना कामाची घाण साफसफाई करण्यात यावी आणि पुढील होणारा अनर्थ टाळावा...

========================================

Post a Comment

0 Comments