⭕ *सात्री गावात मध्ये रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग – तीन घर उध्वस्त कुटुंबांचे संसार भस्मसात...*🔘

 




(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ एप्रिल गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गाव येथे दिनांक 02/04/2025 बुधवार रोजी मध्ये रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन कुटुंबांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.सात्री गावातील पोलीस पाटील विनोद शालिग्राम बोरसे यांनी आग लागल्याची माहिती मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीभाऊ पाटील यांना सात्री गावात आग लागण्याची माहिती दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक जीभाऊ पाटील यांनी अमळनेर प्रथम अग्निशमन ची मदत घेण्यासाठी चोपडा पारोळा धरणगाव धुळे, पाचारण करण्यात आले अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावारे तहसीलदार सुराणा अमळनेर नगरपरिषद तुषार नेतकर मुख्य अधिकारी अमळनेर पोलीस उपविभागीय अधीक्षक विनायक कोते गावातील ग्रामपंचायत सरपंच यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले– गाव हादरले आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण . ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड आगीपुढे ते हतबल ठरले. बघता-बघता तिन्ही घरे जळून खाक झाली.– मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले. मात्र, गावाच्या रस्त्यातील अडथळ्यांमुळे अग्निशमन गाड्या काही काळ विलंबाने पोहोचल्या. शेवटी, धरणगाव येथून आणलेल्या पाण्याच्या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

          घर उध्वस्त, संसार उघड्यावर

या दुर्घटनेत तीन कुटुंबांचे संपूर्ण घरभान नष्ट झाले. अनेक वर्षांची कमाई, घरातील वस्तू आणि धान्य आगीत जळून खाक झाले. पीडित कुटुंबे सध्या उघड्यावर आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची मागणी केली आहे या दुर्घटनेनंतर गावात मदतीचे आवाहन करण्यात आले असून, सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. आगीत कोणतीही जिवंत हानी नाही झाल्याची माहिती पोलीस पाटील विनोद शालिग्राम बोरसे यांनी दिली आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments