( वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी :-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ एप्रिल रविवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मालेगाव केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकर्यांना देण्यात येणार्या पि एम किसान योजनेचे अनुदान पात्र असलेल्या लाभार्थीना देण्यात येतो, परंतु लाभार्थी शेतकर्याचे निधन झाल्यानंतर त्या शेतकर्याला मिळणारे अनुदान मय्यतीच्या नंतर शासनाकडे परत केले जाते.ते अनुदान शेतकर्याच्या वारस असलेल्या पत्नी किंवा वारस असलेल्या मुले -मुली यांना देण्यात यावे.कारण शासनाची ही योजना शेतकर्यांना लाभ दायक असून या अनुदानापासून शेतकरी मंडळींना आर्थिक मदत होते, हे जमा असलेले अनुदान मय्यत शेतकर्यांच्या वारसदाराला मिळत नसल्याने लाभार्थीच्या वारस हे बँकेत व संबंधीत विभागात चक्करा मारतानाचे चित्र दिसत आहे. तहसिलदारांच्या पत्राची मागणी बँक व संबधित विभागातुन केली जाते.की , तुम्ही मयत शेतकऱ्याचे वारस म्हणून कागदपत्रे सादर करा, व नंतर त्या पुढील अनुदान देण्यात येईल असे सांगितले जाते, मय्यत शेतकर्यांच्या वारस म्हणून प्रकिया करण्यास बराच कालावधी लागत असल्याने संबधीत प्रशासनाने मय्यत शेतकर्यानंचे अनुदान शासनाला परत न करता तातडीने व जल्द गतीने स्थानिक स्तरावर वारसदार यांच्या कागद पत्राची तपासणी करून शेतकर्यांच्या वारसदाराला तो लाभ मिळवून देण्यासाठी स्वतःवून सहकार्य करण्याची गरज आहे अशी मागणी समाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्या कडून करण्यात येत आहे...
=========================================
