(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला /अकोला ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ एप्रिल रविवार :- अकोला जिल्ह्यातील अकोला येथील अशोक सम्राट सेना महाराष्ट्र राज्य भरात प्रचरित सेना आहे. या अशोक सेनेच्या माध्यमातून काम केले आहे सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाठ यांना आबेडकरी चळवळीत त्याचे कौतुक होत आहे.अवघ्या सहा महिन्यात राज्यस्तरीय व समाजरत्न या दोन महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित.अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत उभरत नेतृत्व म्हणून आकाश शिरसाट,सम्राट अशोक सेना हे सगळ्यांच्या परिचित आहेत.लहान पना पासून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली असून एक साधारण कार्यकर्ता ते आज संपूर्ण महाराष्ट्र पर्यंत असा त्यांचा प्रवास आहे.आकाश शिरसाट यांनी अनेक आंदोलन मोर्चे काढून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला न्याय मिळवून दिला.भूमीहीन शेतकऱ्यांच्या,कामगारांच्या,अन्या झालेल्यांच्या,विद्यार्थ्यांच्या, गोरगरिबांच्या,न्यायासाठी एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला आंबेडकरी चळवळीत असतांना,छत्रपती शिवाजी महाराजांची विचार,महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे विचार,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार,संत, महापुरुषांचे विचार घेऊन,सम्राट अशोक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आकाश शिरसाट काम करताना आपल्याला दिसतात.जिल्ह्यातील अनेक घटनांना त्यांनी भेटी दिल्या व न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा त्यांना जेल भोगावी लागली,त्यांचा वर हल्ला सुद्धा करण्यात आला परंतु आकाश शिरसाट हे न थांबता न घाबरता या सर्व कठीण प्रसंगांना मागे टाकून चालत राहले.संघर्षच नाही तर सर्व जाती धर्मातील समूहांना सोबत घेऊन सामाजिक कार्य ते करत आहे.रक्तदान असेल,दवाखाना,अत्यावश्यक सेवा,दारू बंदी,अवैध व्यवसाय या सर्व गोष्टींना आळा बसवा,जेणे करून आपले युवक तरुण व्यसनाधीस न झाले पाहिजे या साठी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला आज पाहता आकाश शिरसाट हे फक्त आंबेडकरी समाजामध्ये नाही तर सर्व जाती धर्मातील बहुजन समाजातील लोकांच्या मनावर राज्य करतांना दिसत आहेत,सामान्य माणसांचा आवाज हा शासनाच्या व सरकारच्या पर्यंत पोहचला पाहिजे मूलभूत प्रश्न विधानसभेमध्ये मांडल्या गेले पाहिजे हा विचार करून आकाश शिरसाट यांनी सम्राट अशोक सेनेच्या माध्यमातून काम केले.या सर्व कार्याची दखल घेऊन भव्य समाजरत्न पुरस्कार सोहळा -2025 हा पुरस्कार मिळाला,मागील वर्षी 2024 त्यांना ज्ञानोबा तुकोबा अभंग राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नुकताच जालना मध्ये समाजरत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.विशेष म्हणे अवघ्या सहा महिन्यात दोन राज्यस्तरीय व समाजरत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले व त्यांना आज पर्यंत मिळाले पुरस्कार हे विभागाबाहेर मिळालेले आहे त्यांच्या या कार्याला पाहून संपूर्ण आंबेडकरी चळवळीत त्यांचे कौतुक होत आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा..
========================================


