(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ मे गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील भुसावळ कडून नंदुरबार-सुरत कडे जाणारी रेल मालगाडी अमळनेर रेल्वे स्थानका जवळ दि:१५ रोजी अमळनेर प्रताप महाविद्यालय जवळ दुपारी २ वाजता मालगाडीचे सात डब्बे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतेही जिवितहानी झालेली नाही.रेल्वे मार्गावरील कोणतेही गाडी नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने या घटनेमुळे काही गाण्याचे वेळापत्रक प्रभावित झाले असुन सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होणार आहेत. स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. अमळनेर प्लॉट फॉर्म नंबर एक वरून गाडी पास होत असताना ही घटना घडली असे चर्चा झाली असून मात्र नेमके कारण काय आहे हे काही समजू शकले नाही.मालगाडीचे डब्बे घसरल्याची माहीती मिळ्याल्याच जळगाव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यानी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. त्यानी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दुर्घटनेची सविस्तर माहीती घेतली.प्रशासन पुढील तपास व जलद गती मार्ग मोकळा करण्यात अधिकारी लक्ष देऊन काम करत आहे भुसावल वरून येणारे (ट्रेन) एक्सप्रेस गाड्या सुरत होऊन येणारे एक्सप्रेस गाड्या हे थांबवण्यात आलेले आहे असे रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे मालगाडी चे सात डब्बे हे डॅमेज झाले आहे.रेल्वे प्रशासनाने काम जलद गतीने सुरू केले आहे...
=========================================



