(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ मे गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दिनांक १४ रोजी प्रवासी सुरज चंद्रकांत पाटील राहणार मुंबई हे खानदेश एक्सप्रेसने मुंबई ते अमळनेर असा प्रवास करीत असताना प्रवासा दरम्यान त्यांचे पाकीट गहाळ झाले बाबत ते रेल्वे पोलीस चौकी अमळनेर येथे तक्रार देण्यास आले असता ड्युटीवरील पोलीस हवालदार हेमंत ठाकूर यांनी त्यांना कोच व बर्थ विचारला असता त्यांनी कोच व बर्थ सांगितले असता रेल्वे पोलिसांनी धरणगाव येथे ड्युटीवरील आरपीएफ महेंद्र मिश्रा यांना फोन करून नमूद व कोच चेक करायला सांगितले असता सदरच्या बर्थ वर प्रवासी यांचे पाकीट मिळून आले त्यात त्यांचे महत्वाचे कागदपत्र व 5500 रुपये रोख होते ते रेल्वे पोलिस अंमळनेर वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक पीएसआय विसावळे यांच्या समक्ष प्रवासी यांच्या ताब्यात देण्यात आले त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले प्रवासी यांनी पोलीस अधिकारी यांचे आभार मानून व स्वतः मला पाकीट मिळाल्याचा आनंद आहे असे सुरज पाटील यांनी मत व्यक्त केले...
=========================================
