⭕ *लबाडांनो पाणी द्या : जागर पाण्याचा...शुभांगीताई पाटील, जान्हवी सावंत यांचा डोक्यावर हंडे घेवुन निघाला मोर्चा...*🔘

  ( धुळे शहेर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ धुळे / धुळे  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ मे गुरुवार :- धुळे जिल्ह्यातील धुळे येथील उ.बा.ठा. महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगी ताई व जान्हवी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार 8 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वा. क्रांती चौक , आकाशवाणी , सिडको बसस्टँड अहिल्याबाई होळकर चौक, हडको या भागात जागर पाण्याचा या अंतर्गत महिलांचा हंडा मोर्चा काढून लबाडांनो पाणी द्या! घोषणा बाजी करुन आंदोलन करण्यात आले.धुळे जिल्हयात परशी पुल येथे सुद्धा अशा प्रकाराचेआंदोलन करण्यात आले. 

        सर्वसामान्य जनतेसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असेल तर मग काय उपयोग. या दिवसात पाण्याची जास्त आवश्यक असते. त्यासाठी शासनाने अगोदरच नियोजन करायला पाहिजे. असे याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगीताई पाटील व जान्हवी सावंत यांनी सांगितले. वरील आंदोलनाचे आयोजन महिला आघाडी शिवसेना याच्या वतीने करण्यात आले होते. आणि या आंदोलनाचे पडसाद सगळीकडे उमटत असताना दिसत आहे. पाणी हा फार स संवेदनशील विषय असुन पाण्याशिवाय कोणताही प्राणी व्यक्ती जगु शकणार नाही . त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याबद्दल विचार करावा.पुढे अशी समस्या निर्माण होणारच नाही त्याबद्दल दक्षता घेणे गरजेचे आहे...

==========================================

Post a Comment

0 Comments