⭕ *सकारात्मक विचार, संयम, सातत्य ठेवा यश नक्की मिळेल!..कार्य शाळेत अतिरिक्त आयकर आयुक्त मकवाने यांचे प्रतिपादन...*🔘





(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: ११ मे रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील UPSC परीक्षेसाठी सामोरे जाताना मनातील भीती काढून एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, महत्वकांक्षा मोठी असावी  त्यादृष्टीने मनात आत्मविश्वास, जिद्द,कठोर परिश्रम  घेतले पाहिजे आयुष्यात जे करायचं आहे ते डोक्यात फिट करून टाका असा सल्ला अतिरिक्त आयकर आयुक्त  विशाल  मकवाने साहेब यांनी तरुणांना दिला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर मा.विशाल  मकवाने ,अतिरिक्त आयकर आयुक्त नाशिक, मा. डॉ. डीगंबर  महाले ,मंगळ ग्रह सेवा संस्था ,दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक अमळनेर, डॉक्टर अतुल सुर्यवंशी, डॉ.एस आर चौधरी, डॉ संदीप पाटील, दिलीप सोनवणे, अभय सोनार आदी  उपस्थित होते. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

     पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी  धैर्य ,जिद्द चिकाटी ठेवा ,पुस्तकांशी मैत्री करा, कारण खरं ज्ञान पुस्तकात आहे. सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे.असे आवाहन केले. या प्रसंगी डॉ. अतुल सूर्यवंशी सर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले  म्हणाले की,अधिकारी होणे कठीण आहे. याबद्दल दुमत नाही परंतु अशक्य काहीच नाही. अधिकारी हा संस्कारशील झाला पाहिजे, अधिकारी लोकाभिमुख झाला पाहिजे, त्यांना लोकसेवक असल्याची जाणीव असली पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी  विनोद जाधव सर, पत्रकार अजय भामरे, सोपान भवरे, पंकज पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र भावसार  दीपक वाल्हे आदी उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेत तरुण,तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

=========================================

Post a Comment

0 Comments