(अमळनेर शहेर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ जुन गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेतू केंद्राचे उद्घाटन आज अमळनेर येथे खासदार श्रीमती. स्मिताताई वाघ यांच्या हस्ते पार पडले.या उद्घाटन कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, अमळनेर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, प्रांत अधिकारी,तहसीलदार, पोलीस निरीक्षक साहेब तालुका प्रशासनाचे अधिकारी, सेतू केंद्राचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले की,"सेतू केंद्रामुळे सामान्य जनतेला शासकीय कामकाजासाठी कार्यालयांच्या उंबरठ्यावर भटकावे लागणार नाही. पारदर्शकता, गती आणि उत्तरदायित्व यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल."या केंद्रामार्फत उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अर्जवर्गणी सेवा, विविध योजनांची माहिती अशा अनेक सुविधा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होतील.अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी सुरूच राहील, असे आश्वासन खासदार वाघ यांनी यावेळी दिले...
=========================================

