⭕ *अकोल्यातले पालकमंत्री जिल्हाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी अकोल्यातल्या समस्या सोडवण्यात अपयशी.!.. *🔘

 



(अकोला शहर ता.मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ अकोला / अकोला ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ जुन रविवार :- अकोला जिल्ह्यातील खास बातमी अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत.बीजेपीचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांच्यामध्ये दलित वस्तीच्या निधीवरून प्रचंडवादी वाद निर्माण झाला एकामेकांना शिवीगाळ करून हे नियोजन बैठक उधळून लावली, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या नियोजन बैठक होते, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे बैठक होती.पण अकोल्यातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले,विशेष म्हणजे या बैठकीत लोकशाहीचा ४ आधारस्तंभ असलेल्या मीडियाला पत्रकारांना प्रवेश बंदी होता.पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना का लाईव्ह कामकाज दाखवू दिलं नाही,हे कामकाज सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर होणार होतं तर मंग यात गोपनीयता कशासाठी.?.सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज Live दाखवल्या जाते.देशाच्या संसद आणि विधानसभा विधान परिषद या कामकाज Live दाखवल्या जातात,मंग अकोल्यातल्या पत्रकारांना नियोजन समितीच्या बैठकीत का रोखण्यात आले.?. तुमचा भ्रष्टाचार मीडियात येणार होता म्हणून पत्रकारांना तुम्ही प्रवेश नाकारला का.?.कशासाठी त्यांना प्रवेश नाकारला याचे उत्तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिले पाहिजे.?.अकोला जिल्ह्यात एवढ्या मोठ्या समस्या आहेत,शेतकऱ्यांना बी बियाणं,डीएपी,युरिया रासायनिक खत उपलब्ध नाही,मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची जास्त पैसे घेऊन लूट फसवणूक केल्या जात आहे,शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही यावर कोणताही पालकमंत्री लोकप्रतिनिधी बोलत नाही.आरोग्याच्या समस्या सगळ्यात जास्त अकोल्यात आहेत हे दिसत नाही.तरुण पिढीला रोजगार नाही,अकोल्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे दुर्गंध आहे.मच्छर आहेत त्याची साफसफाई स्वच्छता केल्या जात नाही,पिण्याचं पाणी पंधरा दिवसांनी येते पिण्याचा पाणी सुद्धा वेळेवर दिल्या जात नाही,अशा अनेक समस्या अकोला जिल्ह्यात आहेत पण ते सोडवण्यात इथले स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्री जिल्हाधिकारी हे सर्व अपयशी ठरत आहेत,सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाला हे सोडू शकत नाहीत.यांच्या समस्या आता अकोला जिल्ह्यात निर्माण झाल्या.हे बैठक घेऊन हा दिखावा कशासाठी.?.तुम्हाला जर वादीवाद करायचा होता तर हे बैठक आयोजित कशासाठी केली.?.अकोला जिल्ह्यातल्या समस्या तुमच्याकडून सोडवल्या जात नसतील तर तुमच्या खुर्च्या सोडून टाका खाली करा विनाकारण अकोल्यातल्या जनतेची दिशाभूल करू नका,हे आमच्यावर मेहरबानी करा.!!

        *सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य* 

                आकाश दादा शिरसाट 

   *.राज्यस्तरीय व समाजरत्न. पुरस्कार प्राप्त.*

==========================================

Post a Comment

0 Comments