⭕ *अमळनेरात पालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात रविवारी सहविचार सभा...अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपस्थितीचे जाहीर आवाहन...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

               [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ जुलै शनिवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खास बातमी अमळनेर नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेनुसार शहरातील घरपट्टी व दुकान भाडे करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने यासंदर्भात नागरिकात नाराजीचा सूर असल्याने यासंदर्भात विविध संघटना,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन रविवार दिनांक 13 जुलै रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.सदर सभा सकाळी 10.30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,न्यू प्लॉट,अमळनेर येथे होणार आहे.*

         यासंदर्भात सर्व संघटना,राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना त्यांची स्पष्ट भूमिका मांडता यावी यासाठी सर्वाना एकाच व्यासपीठावर आणले जात असून यासाठी अमळनेर शहर व पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या महत्वपूर्ण सभेस शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,विविध सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक,व्यापारी बांधव,पत्रकार बांधव आणि सर्वपक्षीय नागरिकांनी अवश्य उपस्थिती द्यावी ही विनंती...🙏

*💥💥 अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव 💥💥*

*🔺टीप :- बैठक वेळेवर होईल याची नोंद घ्यावी.*

==========================================



========================================

=======================================

========================================
=======================================
=======================================
========================================
========================================

========================================

Post a Comment

0 Comments