⭕ *बदलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘नित्या क्लासेस’तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम...*🔘 ⭕ *रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कोकबल गावची सुकन्या गार्गी योगेश येलवे हिचाही सुंदर परफॉमंस संपन्न झाला...*🔘

 

(रायगड/बदलापूर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ रायगड / बदलापूर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२१ जुलै सोमवार :- रायगड जिल्ह्यातील बदलापूर येथील खास बातमी दिनांक १९ जुलै २०२५ रोजी बदलापूर शहरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘नित्या क्लासेस’तर्फे एक भव्य भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या खास प्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पारंपरिक भरतनाट्यम सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रशिक्षण हे सुप्रसिद्ध नृत्यशिक्षिका फाल्गुनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अथक मेहनतीने आणि नृत्यावरील प्रेमाने रंगमंचावर अप्रतिम सादरीकरण करत गुरूंप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.हा कार्यक्रम एक भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा अनुभव ठरला. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले, आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे कला-संमेलन अनुभवण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला...

==========================================

Post a Comment

0 Comments