⭕ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रवेश दीपक पाटील तरुणाला मोठा व्हायचे संकेत...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२४  जुलै गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (वाघोदे, ता. अमळनेर) यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिपक पाटील यांचे स्वागत करतांना सांगितले की, "पक्षात येणाऱ्या प्रत्येक नव्या कार्यकर्त्याला योग्य ती जबाबदारी देण्यात येईल. कामाचा ठसा उमठवणाऱ्या प्रत्येकाला पक्षात मानाचे स्थान मिळेल.दिपक पाटील हे यापूर्वीपासून साहेबांच्या संपर्कात होते. त्यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करताच त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्याचे आश्वासन शिंदे साहेबांनी दिले.

        या प्रसंगी नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा. तुषार सनंसे,, तसेच वाघोदे येथील मान्यवर . जगन्नाथ राजमल पाटील, पंजाबराव पाटील (ढेकू), तुषार पाटील, उमाकांत ठाकूर यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करून पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या ऐतिहासिक प्रवेशामुळे वाघोदे आणि आजूबाजूच्या भागातील राष्ट्रवादी पवार गटाला नवसंजीवनी मिळेल, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. महाराष्ट्रातील अमली पदार्थ व अवैध धंदे बद्दल व तरुणांना व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करा व चांगल्या कामासाठी आंदोलन करा तरुणांना संधी द्या त्यांना मोठे करा असे महाराष्ट्राचे नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तरुणांना एक मोठे आव्हान पक्षात कोणाबद्दलही चुकीचे समजले जाणार नाही योग्य काम करणाऱ्यांना पक्ष अध्यक्ष शरद पवार कामाप्रमाणे त्यांना संधी दिली जाईल असे शिंदे आढावा बैठकीत व पक्ष प्रवेश या नवीन उमेद नवीन जोश कार्यकर्तांनो कामाला लागे असे संकेत देण्यात आले महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री  एकनाथ खडसे मुक्ताईनगर यांनी फोन द्वारे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या...

=========================================

Post a Comment

0 Comments