⭕ *पोलीस पॅनल करीता आयकॉन हॉस्पिटल संलग्नित...*🔘 ⭕ *सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली होती मागणी...*🔘



(अकोला तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

               [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ अकोला / अकोला ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१८ जुलै गुरुवार :- अकोला जिल्ह्यातील अकोला येथील पोलिस कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. ड्युटी बरोबरच त्यांना स्वतः च्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी असते पंरतु अकोला पोलिस कर्मचारी साठी पोलिस पॅनल चे कोणतेच हॉस्पिटल ॲटच नव्हते. पोलीस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपचारासाठी नागपूर ला जावे लागत होते. ही बाब पोलीस कर्मचारी यांनी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना सांगितली त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना पत्र देऊन पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली होती. 

      त्यावेळी त्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन पोलीस अधिकारी  होम डि वाय एस सी नितिन शिंदे साहेब यांनी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाऊन सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून लवकरच पोलीस पॅनल करीता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲटच होणार असे सांगितले होते.सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या पत्राची दखल घेऊन पोलिस कर्मचारी आणि अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी अकोल्यातील आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲटच करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या या सामाजिक कृतीमुळे पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले...

=========================================

Post a Comment

0 Comments