⭕ *अमळनेर अवैध वाहतूक करताना गांजा पकडताना पोलीस प्रशासनाला यश...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

               [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१८ जुलै गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खास बातमी अमळनेर तालुका पोलीस प्रशासनाकडून सतर्क राहून गांजा पकडण्यात पोलीस प्रशासनाला फार मोठ्या प्रमाणात गांजा  मिळत आहे शहरात पोलीस प्रशासनाकडून सापडा रचून कारवाई करताना गुप्त माहीती मिळाली की, दोन इसम हे मोटर सायकल क्रं. एम. एच. १९ सी. टी. ४८४५ हिच्यावर बेकायदेशीर गांजा  विक्री होते जळोद गावाकडुन अमळनेर शहरात येणार आहे. बाबत  पोलीस निरीक्षक  दत्तात्रय निकम यांना माहीती कळविल्यावरुन  उपविभागीय पोलीस अधिकारी . यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापडा रचण्यात आला जळोद ता. अमळनेर या गावात सोबत पोलीस कर्मचारी सह अधिकारी, पंच, फोटोग्राफर, वजन मापाडी व लेखनीक अमलदार सह जळोद ता. अमळनेर या शिवारातील रोड लगत एका शेताजवळ थांबलो. त्यानंतर २२.१० वाजेच्या सुमारास जळोद गावाकडुन एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना मोटर सायकलवर दोन इसम हे डबलशीट येत असल्याचे लक्षात आल्याने पोकॉ अमोल पाटील व पोकॉ जितेंद्र निकुंभे यांनी  मोटर सायकल चालकास थांबण्याचा इशारा केल्याने  गाडीवरील चालकाने त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल थांबविली. त्यानंतर आमच्या सोबत असलेला पोलीस स्टाफ अश्यांनी त्यांच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची गोणीसह त्या दोघा इसमांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक  दत्तात्रय निकम यांनी स्वत चे पोलीस ओळखपत्र दाखवत  रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी सोबतच्या पोलीस स्टाफ व पंच तसेच इतरांची स्पष्ट ओळख करुन दिली व त्यांना पंचांसमक्ष त्यांचे नाव पत्ता विचारले असता मोटर सायकल चालकाने त्याचे नाव महेश कैलास पाटील वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. मेन रोड, जडे गल्ली, भडगाव ता. भडगाव जि. जळगाव व त्याचे सोबत असलेला इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन शरद गाँड (मसराम) वय १९ वर्षे धंदा मजुर रा. गौंडबस्ती देशमुखनगर,पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव पुढील  विभाग शोध पथक तपास करत आहे...

==========================================

Post a Comment

0 Comments