(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१८ जुलै गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील बोहरा गावाची खास बातमी तापी, बोरी आणि अनेर च्या संगमावर असलेल्या बोहरा गावाचे निम्न तापी प्रकल्पात 100 टक्के पुनर्वसन होण्यासाठी गावकऱ्यांनी 16 जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदारांच्या घरावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. निम्न तापी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात आले ते अत्यंत चुकीचे झाले आहे. बोहरा गाव नियोजित धरणाच्या एक किमी अंतरावर आहे. तसेच तापी, बोरी आणि अनेर च्या संगमावर आहे. 2005-06 साली अतिवृष्टी झाली होती तेव्हा संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. ग्रामस्थ आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. त्यावेळी धरणाचा पाया देखील बांधला गेला नव्हता. जेव्हा धरण होईल तेव्हा तेव्हा बोहरा गाव पूर्ण पाण्याखाली येईल. त्यामुळे तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून गावावर अन्याय झाला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी 26 मार्च 2025 रोजी सर्व अधिकाऱ्यांसह भेट दिली तेव्हा गावाची नवीन हाय फ्लड टेस्ट, प्लॉट टेस्ट घरांचे संरचनात्मक ऑडिट व नवीन माती परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटूनही त्यावर काही कारवाई झाली नाही. तसा अहवालही तयार करण्यात आला नाही. त्यामुळे गावाचे पुनर्वसन पूर्णतः होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी 16 रोजी आमदार अनिल पाटील आणि प्रांत कचेरीवर मोर्चा काढ येणार आहे. योग्य कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी बोरी नदीच्या काठावर जलसमाधी घेणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला असून गावकऱ्यांना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या परिवाराने जयश्री पाटील यांनी आम्ही आपल्या सेवेत आहोत असे आश्वासन देऊन हा प्रश्न मार्गी लावू गावकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी आम्हाला न्याय न मिळालाच आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा दिला आहे...
===============================//==========



