( धरणगांव शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / धरणगांव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ जुलै मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय शांताराम महाजन यांचे काका व विनायक आत्माराम महाजन यांचे वडील कै.आत्माराम वामन महाजन यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने घेण्यात आला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी म्हटली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी प्रबोधन केले. कैलास माळी, संजय महाजन, गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.सत्यशोधक विधीची प्रेरणा गलाले परिवाराचे जावई शांताराम सुखदेव तायडे टाकळी खुर्द, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव, सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाली.
याप्रसंगी सर्व पित्रांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. गलाले परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी शांताराम तायडे, गंगाराम महाजन, विठ्ठल पाटील, मयुर महाजन, प्रशांत महाजन, गणेश महाजन, काशिनाथ महाजन, प्रा. समाधान महाजन, अमोल महाजन , विजय महाजन, विनायक महाजन यासह शहरातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी केले...
=========================================





