⭕ *आमदारांनी अडवले सात्री गावाचे पुनर्वसन..! तिन दिवसावर येऊन ठेपलेले काम थांबवणे चुकीचे आहे...आमदारांची चुक आमदारांनी दुरुस्ती केली पाहिजे...*🔘


   

(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०५ ऑगस्ट मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील खास बातमी अमळनेर तालुक्यातील बोरी नदीवर पाडळसरे धरण एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असताना १९९९ मंजूर केले होते.त्या धरणाच्या बॅकवॉटर मुळे अनेक गावांपैकी सात्री गांव पुर्णतः बुडीत आहे.तर मग तेथील घरांचे पुनर्वसन करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारीने २५/८/२००३  काढलेत.त्यात सर्व्हे करून १७५ घरांना  २००८ मधे पर्यायी जमीनचे उपलब्ध  भुसंपादन केले.प्लॉट पाडले.तर ताबडतोब वाटप केले पाहिजे होते.येथे कोणतेही सबळ कारण नसतांना उशीर का केला?यांचे उत्तर कोणत्याही कायद्यात नाही.कोणत्याही अधिकारी कडे नाही.२००८ ते २०२२ पर्यंत कुटुंब संख्या वाढणारच.तर मग मागील १४ वर्षाचे काम थोपवणे कितपत योग्य आहे?आणखी १४ वर्षे थांबवले तर आणखी कुटुंब संख्या वाढेल.या वाढीव कुटुंब संख्या साठी पुनर्वसन करूच नये का?

      तब्बल १४ वर्षांनंतर  प्लॉट वाटपाचा कार्यक्रम ३०/५/२०२२ रोजी करण्यात यावा ,असे निश्चित करण्यात आले.ती माहिती मिळताच अमळनेरचे आमदार श्री अनिल भाईंदास पाटील यांनी २७/५/२०२२ ला ही प्लॉट वाटपाची प्रक्रिया स्थगित करण्याचे पत्र दिले.फेर सर्वेक्षण करावे, इतकेच कारण दिले होते.हे कारण पुरेसे नाही.आमदारांनी असे पत्र देऊन १४ वर्षे प्रलंबित प्लॉट वाटपाचे तीन दिवसावर येऊन ठेपलेले काम  थांबवणे चुकीचे आहे.लाभार्थी ग्रामस्थांना आमदार कडून अशी अपेक्षा नव्हती.आमदार अशी उलटी सुलटी कामे  करतात,हे नागरिकांच्या लक्षात आले आहे.असे पत्र दिले तरीही महसूल अधिकाऱ्यांनी प्लॉट वाटप थांबवणे आवश्यक नाही.आमदार आणि मंत्री महसूल अधिकाऱ्यांना आपल्या लहरी प्रमाणे नाचवतात.आणि अधिकारी उच्चशिक्षित असूनही अशिक्षित आमदारांचे ऐकून नाचतात.हे चुकीचे आहे.कारण नवीन वाढीव लाभार्थी असले तर नवीन वाढीव मंजूरी घेता येते.पण जाणिवपूर्वक दुष्ट बुद्धीने मंजूर काम स्थगित करणे भयंकर वाईट आहे.आमदारांनी अशी उलटी सुलटी कामे करू नयेत. मतदारांचे हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमदार निवडून देतो.




      सात्री गांव तापी आणि बोरी नदीच्या कात्रीत सापडलेले आहे.धरणा मुळे बुडीत झालेले आहे.सरकार ही समस्या सोडवते,पुनर्वसन करते . पुन्हा तेच आमदारांच्या कैचीत आल्याने संकटात सापडलेले आहेत.या वेळी हेच आमदार अनिल पाटील पुनर्वसन मंत्री होते.तेच झारीतील शुक्राचार्य होते.मतदारांचे हे दुर्भाग्य..!

सात्रीला नद्यांची कात्री...वरून आमदारांची कैची!

       या कैचीत सापडलेल्या गावकऱ्यांचा धीर सुटला.पून्हा १५/८/२०२४ ला आमरणाची नोटीस दिली.पुनर्वसन चे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी १४/८/२०२४ ला प्रांताधिकारी अमळनेर यांना लेखी आदेश दिलेत." मौजे सात्री तालुका अमळनेर येथील पुनर्वसन गावठाणातील भुखंड वाटपाची कार्यवाही जुन्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात येईल."तब्बल एक वर्ष झाले.तरीही उप जिल्हाधिकारी पाटोळे साहेबांनी शब्द पाळला नाही.भुखंड वाटप केलेच नाही.धरणग्रस्त विस्थापितांना नवीन जागी पुनर्वसन करणे ही प्रस्थापित प्रक्रिया आहे.त्यात सुद्धा अधिकारी आणि आमदार असे वेळ काढत असतील तर साफ चुकीचे आहे.असे करणे जनतेची फसवणूक आहे आणि सरकारशी बेइमानी आहे.

        आज आमदार अनिल पाटील यांचेशी फोन वर बोललो असता,ते म्हणाले कि आता जुन्याच सर्व्हेक्षण नुसार प्लॉट वाटप केले पाहिजे.आमदारांची चूक आहे.आमदारांनी दुरूस्त केली पाहिजे.

शिवराम पाटील मो.नं. ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव महाराष्ट्र 

=========================================

Post a Comment

0 Comments