(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ जुलै बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो, असे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.पोलीस पाटील गोविंदा पाटील हे जैतपीर गावात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलिसांच्या मदतीला धावून जातात आणि नेहमीच सहकार्य करतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना हे विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भविष्यातही ते आपले कर्तव्य अशाचप्रकारे चोख बजावत राहतील आणि महाराष्ट्र पोलीस दलाची उज्ज्वल परंपरा जपतील, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते, आणि अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय युवराज निकम यांनीही गोविंदा पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल जैतपीर गावकरी आणि सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे...
=========================================
