⭕ *जळगावमध्ये लाचखोरीची साखळी सुरूच:भुसावळमध्ये दोन सहायक फौजदार लाच घेताना रंगेहात...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२२ ऑगस्ट शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे थांबताना दिसत नाहीत. आता भुसावळ येथील तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन सहायक फौजदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

          *काय आहे प्रकरण?*

एका तक्रारदाराविरुद्ध चेक बाऊन्स प्रकरणी खामगाव न्यायालयात खटला दाखल आहे आणि न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द न करण्यासाठी आणि वॉरंटची मुदत वाढवून देण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील (वय ५५) आणि आत्माराम सुदाम भालेराव (वय ५७) यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी केली असता, पाटील आणि भालेराव यांनी दोन हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली.शुक्रवारी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बाळकृष्ण पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती ठाणसिंग जेठवे (वय ४२) याने लाचेची रक्कम स्वीकारली. या तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत होते.

      *जिल्ह्यात लाचखोरीचा मालिका सुरूच*

गेल्या काही दिवसांत जळगाव जिल्ह्यात लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दोनच दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेतील लिपिक आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. याशिवाय, पाचोरा, पारोळा आणि चाळीसगावमध्येही लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या घटनांमुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे,यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील,पोहेकॉ किशोर महाजन,पोनाबाळु मराठे,पोकॉ प्रदिप पोळ,भुषण पाटील प्रणेश ठाकूर आदिंच्या पथकाने केली...
=======================================

Post a Comment

0 Comments