(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ ऑगस्ट बुधवार :- (जळगाव) :जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा.किरण अशोक पाटील यांची तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निवड केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.सन १९८७ साली स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे सभासदत्व जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.या निवडीप्रसंगी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अनिल पाटील, चेअरमन प्रा.डॉ.राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमन प्रा.डॉ.विजय सोनजे, भालोद कॉलेजचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, प्रा.डॉ.किशोर पाटील, प्रा.सुरेश अत्तरदे, प्रा.डॉ.अतुल देशमुख, प्रा.डॉ.शैलेशकुमार वाघ, प्रा.डॉ.संजीव साळवे, प्रा.डॉ.सौ.सुनिता चौधरी, प्रा.डॉ.स्वाती शेलार, प्रा.राजेश पाटील, प्रा.डॉ.प्रशांत पाटील, सुभाष वाघ, संजय इंगळे, प्रसाद भोसले आदी मान्यवर उपस्थित राहून आभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीबद्दल पतपेढीचे कार्यकारी संचालक मंडळ, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खा.शी. संचालक मंडळ, पत्रकार संघटना तसेच मित्रपरिवाराकडून प्रा.किरण पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे...
=========================================
