(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:30 ऑगस्ट शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड,येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात "राष्ट्रीय क्रीडा"दिवस साजरा करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. देवदत्त पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व विविध खेळांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच खेळाडू असावे. हॉकी, कबड्डी,कुस्ती,क्रिकेट, फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळावे. युवा भारताकडे पाहतांना तरुणांनी विविध खेळाच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सतिश पारधी यांनी केले.व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .डॉ.व्हि.डी.पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. दिलीप कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले...
==========================================
