⭕ *सोमठाणा येथे पोखरा योजनेअंतर्गत महिलांची शेती शाळा संपन्न... कृषी सहाय्यक गजानन इढोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन...*🔘

(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी: अजय गायकवाड) 

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१७ ऑगस्ट रविवार :- वाशिम  जिल्ह्यातील मालेगाव  तालुक्यातील सोमठाणा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत महिलांची शेती शाळा कार्यक्रम संपन्न झाला. सदर शेती शाळेचे आयोजन सोमठाणा गावचे कृषी सहाय्यक अधिकारी गजानन इढोळे यांनी केले. सदर शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी विनोद सोळंके, गजानन नरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील शेती शाळेचा आढावा घेऊन शेती शाळेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष पिकांचे निरीक्षणे नोंदविण्यात आली. तसेच पिकांची उंची रुंदी ठिकाणी झाडांच्या फांद्या फुलांची संख्या इत्यादी नोंदी नोंदविण्यात आल्या. पिकावरील मित्र किडी व शत्रू कडूंची निरीक्षण करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी निरीक्षण नोंदवून चार्ट बनवण्यात आला व आजच्या शेतीशाळेमध्ये वातावरणानुसार निर्णय घेण्यात आला‌. यावेळी नरवाडे सरांनी पिकावरील मित्र किडींची ओळख करून दिली तसेच सोळंके सरांनी शत्रुगिरींची ओळख करून दिली व त्यावरील एकात्मिक कीड व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. तसेच सोमठाणा गावचे कृषी सहाय्यक गजानन इढोळे यांनी शेतकऱ्याचे हित लक्षात घेता शासनाच्या विविध योजना शेतकरी वर्गाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असतात. यावेळी शेती शाळेला सोमठाणा येथील बहुसंख्य महिला, पुरूष तसेच तरुण शेतकरी उपस्थित होते.

=========================================

Post a Comment

0 Comments