(चाळीसगांव तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / चाळीसगांव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:30 ऑगस्ट शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील पिलखोड येथील गिरणा नदीपात्रात दोन तलवारी व दोन कोयते असल्याची माहिती पिलखोडचे पोलिस पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना देताच तत्काळ पिळखोड बीटच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत हत्यारे पंचनामा करून जप्त केली आहेत. पिलखोडचे पोलिस पाटील प्रशांत पाटील यांना दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की गिरणा नदीपात्रात तलवारी व कोयते पडलेले आहेत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मिळालेली माहिती खरी आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नमुद ठिकाणी दोन तलवारी व दोन कोयते दिसून आल्यानंतर त्यांनी सदरची माहिती मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक प्रविण दात्रे यांना दिल्यानंतर दात्रे यांनी पिलखोड बिटचे कर्मचारी पो.हे.कॉ. मोहन सोनवणे, पो.कॉ बाबासाहेब पगारे, पो.कॉ भुषण बाविस्कर, पो.कॉ प्रशांत खैरे यांना घटनास्थळी पाठविले. संबंधीतांनी पंचनामा करून तलवारी व कोयते ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. चाळीसगांव न.पा.चे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याशी हे हत्यार संबंधीत आहे का याचा तपास सुरू झाला असून,मालेगांवकडे पळून जातांना या तलवारी आणि कोयते हल्लेखोर आरोपींनी गिरणा नदीपात्रात टाकली असावी असा संशय आहे.त्यादिशेने देखील पोलिस तपास करीत असून चाळीसगांवचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी देखील या गंभीर प्रकाराची माहिती त्यांना प्राप्त होताच मेहुणबारे पोलिस स्टेशनचे एपीआय दात्रे यांना या बेवारस स्थितीत सापडलेल्या प्राणघातक शस्त्रांच्या संदर्भात योग्य तो तपास करण्याची सुचना दिल्या आहेत...
=========================================

