⭕ *महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले आणि त्यांचे सचिवांनी नाकारले...? *चतुर्थश्रेणी देता येणार नाही ही माहिती मिळताच महसूल कर्मचारी गोपाल बेलदार यांच्या हृदयविकाराचा झटक्याने जागीच मृत्यू...*🔘

 

          ( शिरपूर शहर मानद प्रतिनिधी:नरेंद्र रायसिंग ) 

                  [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ धुळे / शिरपूर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२४ शुक्रवार :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खास बातमी स्व.गोपाल बेलदार हे महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे, व कार्यतत्पर आणि निष्ठावंत कर्मचारी होते. त्यांनी तब्बल महिनाभर नागपुर येथे संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आंदोलन स्थळी भेट देऊन चतुर्थ श्रेणी देण्याचे आश्वासन दिल्याने महसूल सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

         दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांचे सचिवांनी ‘महसूल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी देता येणार नाही’ असे स्पष्ट केल्याची माहिती मिळताच, स्व.गोपाल बेलदार यांना तीव्र मानसिक धक्का बसला. आणि काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

      स्व.बेलदार हे अविवाहित होते तसेच त्यांच्या भावाने सांगितले की, “स्व.गोपाळ बेलदार हे मुंबईच्या बैठकीला जात होता.चतुर्थ श्रेणी मंजूर झाल्यावर बँकेचे कर्ज काढून घर बांधायचे त्याचे स्वप्न होते. पण बॅकेने देखील किमान २५ हजार पगार असेल तरच कर्ज मिळेल असे सांगितले. महाराष्ट्र शासनाने नकार दिल्याने त्याचे मानसिक ताण बिघडले आणि या ताण तणावामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला..”

     तसेच या घटनेमुळे महसूल कर्मचारी वर्गात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी संघटनेने शासनाला मागणी केली आहे की, “आता तरी शासनाने महसूल कर्मचाऱ्यांना न्यायाने विचार करून त्यांना चतुर्थ श्रेणी मंजूर करावी,” तसेच स्व.गोपाल बेलदार यांच्या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “आम्ही एक समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ सहकारी गमावला आहे. ही घटना संपूर्ण महसूल विभागासाठी अत्यंत दुःखद आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घ्यावी.

==========================≈======================

Post a Comment

0 Comments