( शिरपूर शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ धुळे / शिरपूर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१७ शनिवार :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खास बातमी दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी ६९ वा ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा' मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला, तसेच या १४ ऑक्टोंबर ऐतिहासिक,'धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा' कार्यक्रमात शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्धवाडा परिसरात *विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन* जवळ जाहीर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन समस्त समाज बांधवांच्या वतीने, सालाबादप्रमाणे करण्यात आले होते.
तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. व सामुहिक पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शाहिर प्रवीण पाणपाटील,शाहीर विजय अहिरे व शाहीर आनंद महाराज यांनी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर ' आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे ' हे अभिवादन गीत गायिले व 'तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे ' हे क्रांतीगीत ' विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेतील' विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर जाहीर प्रबोधनात्मक व्याकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि औपचारीकतेचा भाग म्हणून नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आठवले सर व प्रमुख वक्ते ॲड.वैशाली डोळस मॅडम यांचा जाहीर सत्कार ' धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा समन्वयक समितीच्या' वतीने मंचावर करण्यात आला. तसेच या ऐतिहासिक सुवर्ण दिवसाचे औचित्य साधुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'स्टडी सर्कल'ची स्थापना करण्यात आली, असे जाहीर करण्यात आले. 'स्पर्धा परीक्षा व इतर मार्गदर्शन , प्रबोधनपर पुस्तके व वैचारिक ग्रंथ वाचनासाठी लोकसहभागातून उपलब्ध करण्यात येईल आणि १४ ऑक्टोबर ' धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा' हा भारतीय इतिहासातील एक सुवर्ण ऐतिहासिक दिवस ओळखला जातो. या महाराष्ट्रात ब्राम्हणी इतिहासकारांनी तिथीनुसार *'शिवजयंती'* चा नियोजनबद्ध घोळ उभा केला. हा नियोजनबद्ध घोळ महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींनी अर्थात मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच सत्यशोधक चळवळींनी तिथीचा ब्राह्मणी घोळ हाणून पाडला आणि आज सर्वकडे शिवजयंती हि तारखेनुसारच साजरा होताना दिसत आहे.'तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा' हा देखील तारखेलाचा साजरा व्हावा ! ब्राह्मणी तिथी पासून आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे.असे प्रास्ताविकेत ज्वाला मोरे सर यांनी सांगितले. आणि कार्यक्रमात तरुण युवकांना मंचावर बोलावून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष आठवले सर व व्याख्याते ॲड.वैशाली डोळस मॅडम यांच्या हस्ते जाहीर सन्मान करण्यात आला. तसेच शिरपूर शहरातील व ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ते व्यावसायिक क्षेत्रातील प्रमुख मंडळी व कष्टकरी-कामगार बंधु आणि भगिनींची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांचा - कॉ.गोविंद पानसरे लिखित *'शिवाजी कोण'होता* ? हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला आणि विशेष सन्मान सत्कारमुर्ती *PHD* प्राप्तीचा बहुमान म्हणून,आदरणीय प्रा *.डॉ.राजू गिरिधर पवार* सर यांचा जाहीर नागरी सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात व आतिषबाजीत पार पडला. सदर महाविद्यालयीन काळापासून ते आतापावेतो सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे तसेच सामाजिक प्रश्नांवरची जनजागृती, आदिवासी नायक ते सामाजिक परिवर्तनाचे नायक यांचे साहित्य भेट, कोरोना काळात ५३ कुटुंब यांना किराणा घरपोच साठी समन्वयकची उत्तम भुमिका तसेच धम्म चळवळीत वैज्ञानिकता व नितीमुल्यांची रूजवण्यासाठीचे प्रयत्न हे सर्व आपल्या दिव्यांगतेवर मात करत ते आतापावेतो करताना दिसत आहेत म्हणून त्यांचा जाहीर नागरी सत्कार - सन्मान ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून करण्यात आला.
*'सिद्धार्थ ते तथागत ' पर्यंतचा प्रवास म्हणजे नद्या जसे आपले अस्तित्व समुद्रात जाऊन विलीन करतात तसा सिद्धार्थचा प्रवास आहे .' स्व'चा अर्थात सर्वस्वाचा त्यागातूनच बुद्धत्व प्राप्तकडे जाण्याचा मार्ग खुला होतो असे सुरूवातीला अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुभाष आठवले यांनी सांगितले. आणि प्रमुख वक्त्या ॲड. वैशाली डोळस मॅडम यांनी,' *चीफ जस्टिस ऑफ इंडिया* यांच्या वर फेकलेला बुट म्हणजे 'मनुस्मृती'तला मनु आजही जिवंत आहे,मनु बुटचे प्रतिक आहे. तो आजही जिवंत आहे.जनू तो संविधानाच्या मूल्यांवर मारलेला बुट आहे. असे हजारो वर्षापासून जात आणि धर्माचे श्रेष्ठत्व असणाऱ्यांना,MY LORD *बोलणं सहन होत नाहीये. जर आज ब्राह्मणी मुजोरी घालवायची असेल तर महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'गाथा मधला क्रांतिकारी बुद्ध' आपल्या हाती दिला आहे. तो बुद्धम् नमामि, शरणं नमामि,संघम नमामि एवढा पुरता मर्यादित नाही. असा बुद्ध बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये.आज बुद्धिस्ट माणसाची खरी ओळख सांगताना,"ज्याला अन्यायाची चिड येत नाही, ज्याला शोषणाच्या व्यवस्थेविषयी काहीच वाटत नाही, त्याला आपण बुद्धिस्ट कसे म्हणावे?" असा प्रश्न यावेळी करण्यात आला. बुद्धिजीवींनी घडलेल्या घटनांवर चकचक न करता रस्त्यावर येऊन जाब विचारला पाहिजे. आज बुद्धाचे क्रांतिकारकत्व सांगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. बुद्ध भारत देशाचा या मातृभुमिचा सुपुत्र आहे. बुद्धाने या देशात कुठली क्रांती केली? ती सांगण्याची वेळ आज आली आहे. विहारात खीर पिणे,कडक जयभिम, लाल जयभिम एवढ्या कामासाठी विहारे नकोत ते चर्चेचं स्थळं असावीत. बुद्धांचे साहित्य घराघरापर्यंत गेले पाहिजे,त्यांचे पारायणे होऊ नयेत, त्यावर चर्चा व्हाव्यात कारण *कोणत्याही क्रांतीची पूर्व अट ही प्रबोधन आहे* इथली शोषक ब्राम्हणी भांडवली व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी बुद्धाचा क्रांतीकारी धम्म समजून घ्यावा लागेल. २५००० वर्षा पूर्वी बुद्धांनी आपला धम्म संस्कृतमध्ये न सांगता;तो पालीत सांगितला कारण पाली त्यावेळची जनभाषा ही पाली होती. क्रांतीकारी धम्म समजून सांगण्यासाठी अशीच कृती अवलंबावी लागेल. इतिहासात वारकरी संत परंपरेने समतेची बीजे रूजवली आणि त्यातून स्वराज्याचा पाया उभा राहिला. पुढे महात्मा फुलेंनी ब्राह्मणी व्यवस्थेचं षडयंत्र ओळखलं आणि आमच्या दु:ख आणि शोषणाचे मुळ , "वित्त(पैसा) अविद्या शोधून काढले. त्यावेळी त्यांनी तसा सिद्धांत ठणकावून सांगितला.पुढे संविधानरूपी कळस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला. भारतीय संविधानाने आम्हाला कायदेशीर माणूस केलं! भारतीय संविधानातील हक्क, अधिकार वाचवण्याची जबाबदारी आपली आहे असे ॲड.वैशाली डोळस मॅडम यांनी आपल्या मांडणीत सांगितले.तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम महिरे सर यांनी केले. व वक्ता परिचय कल्पना ईशी मॅडम (मुख्याध्यापक KVP), यांनी केले आणि अध्यक्ष परिचय नितीन मंगळे सर यांनी केले आणि PHD सत्कारमूर्ती परिचय हेमंत धिवरे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठीचे प्रयत्न 'धम्मचक्र प्रवर्तन' समन्वयक समिती व सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन केलेत, या कार्यक्रमाचा समारोप देशाचे राष्ट्रगीत पासून तर आभाराने करण्यात आला..
=================================================

