( अमळनेर तालुका / शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर शहर राजकारणाचा कुठलाही वसा किंवा वारसा नसताना आपल्या सोज्वळ , मितभाषिक, प्रामाणिक, आणि समाजाची समाजसेवा करण्यासाठी आपले आयुष्य मार्गी लागावे हाच हेतू नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणारे हसतमुख चेहरा म्हणजे उमाकांत सुकलाल ठाकूर हे होय..
दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं.. त्यांना मदत करावी ..हाच ध्यास मणी ठेवत समाजसेवेचे व्रत हाती घेत संघर्षमय वाटचाल करणारे उमाकांत ठाकूर यांची घरची परिस्थिती बेताचीच... त्यांचे वडील सुकलाल ठाकूर हे शासकीय दुग्धविकास अधिकारी यांच्या वाहनांवर चालक म्हणून नोकरी केलेले... लहानपणापासून वडिलांच्या या सेवेमुळे उमाकांत यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली.
त्याच अनुषंगाने त्यांनी शिक्षण करत असताना विद्यार्थ्यांना आलेल्या समस्यांचे निवारण ही केले.. ग्रॅज्युएट नंतर त्यांनी परिवाराला साथ देत कुटुंबाला हातभार लावला.. दरम्यानच्या काळात एका वृत्तपत्रात त्यांनी वितरण विभागाची जबाबदारी पार पाडली..हेच सुरू असताना त्यांचा जनसंपर्क वाढला आणि तिथूनच त्यांचा समाजसेवेच्या प्रारंभ सुरू झाला.. सुरुवातीला शहरात व शहरा बाहेर त्यांनी वृक्ष लागवड केली..
दिवाग्यांना मदत करत त्यांच्या अडचणी सोडल्या.. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्यांची वाचा फोडत समाज मनाला न्याय मिळवून दिला आहे... हसत बोलत सर्वांची हात मिळवत आपुलकी आणि जिव्हाळा पेरणारे या व्यक्तिमत्वाने आता सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे...
उमेदवारी दाखल करताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता हक्काचे व्यासपीठ उभारणे.. मागासवर्गीय वस्ती सुधारणा साठी सतत प्रयत्नशील राहत काम मार्गी लावणे असे घोषित केले असून शहरातील मूलभूत सुविधा देत स्वच्छता सांडपाणी आणि वृक्षारोपण यावर लक्ष केंद्रित केले जाईल.आरोग्य करिता विविध शिबिरे आयोजित करून सेवा उपलब्ध करून मिळेल..
नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही. अशी ग्वाही देत त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांचा गाढा जनसंपर्क आणि मोठा असलेला मित्रपरिवार हाच त्यांचा विजय खेचून आणेल हे मात्र नक्की...! त्यांचे शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा देत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे...
===================================================

