( सुरत जिल्हा/शहेर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ सुरत / उधना ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ गुरुवार :- सुरत जिल्ह्यातील खास बातमी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस भारत देशाच्या इतिहासात नोंद राहील असा दिवस आहे .भारत देशाच्या भविष्याची पायाभरणी करणारा दिवस 26 नोव्हेंबर 1949 ला स्वतंत्र भारताने आपले संविधान स्वीकारले होते. आणि संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. आणि त्या संविधानानुसारच आपला भारत देश आज चालत आहे. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर 2015 ला पहिल्यांदा भारत सरकारने सविधान दिन साजरा करावा असे जाहीर केले आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होत आहे.
👉🏻भारतीय संविधान हे कोणत्याही देवाला अर्पण केलेले नाही. ते भारतातील लोकांनाच अर्पण केलेले आहे. ही संविधानाने सामान्य लोकांना दिलेली ताकद आहे. संविधानाने सामान्य माणसाला दिलेला श्वास आहे. सामान्य माणूस हाच या देशाचा राजा आहे. तो एखाद्या पक्षाला निवडून देऊ शकतो. आणि त्याला पाडू शकतो.
👉🏻डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या अशी केली आहे की, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गाने घडून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही*.
👉🏻भारतीय संविधान म्हणजे माणसाला जगणे शिकवते माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करते. भारतीय संविधानामुळेच सर्व जाती धर्माचे लोक आज सुखाने आनंदाने जगत आहोत. संविधानानुसार आपल्या भारत देशाचा राज्यकारभार चाललेला आहे. त्यामुळे संविधानाला खूप महत्त्व आहे . स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हा संविधानाचा गाभा आहे. हा गाभाच बदलला तर आपले माणूस पण शिल्लक राहणार नाही आणि एकदा जर माणूस पण हिरावून घेतले तर ते माणूस पण कधी मिळेल हे सांगता येणार नाही. आणि हे सर्व अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळेच आपण सर्वजण माणूस म्हणून जगत आहोत. परंतु जर संविधानच नसेल तर आपले माणूस पण शिल्लक राहणार नाही. म्हणून आपण फक्त संविधान दिन साजरे करून जमणार नाही. आपणच जर संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करणार आहे. संविधानाचे रक्षण करणे हे सर्व भारतीय नागरिकांच्या कर्तव्य आहे. संविधानच नसेल तर कोणताही अधिकार आपल्याला राहणार नाही. आज संविधान आहे त्याचमुळे आपण, आपला भारत देश, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणि आनंदाने आहेत.
👉🏻आपण आज असा विचार करूया संविधान आहे म्हणून आपण आहोत. संविधान लिहिले आहे त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय, किंवा माणूसपणाने जगत आहोत. ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे.
👉🏻परंतु जर संविधान लिहिलेच नसते तर काय झाले असते.जर संविधान या देशाला नसते तर आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला नसता. आपण आनंदाने सुखाने जगलो नसतो. आज जे केवळ आपण जीवन जगत आहोत. ती संविधानाची देण आहे ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे.
👉🏻कारण देश म्हणजे काय ? देश हा माणसांचा बनलेला असतो. देशाची भौगोलिक सीमा म्हणजे देश नव्हे. किंवा देश फक्त उच्चभू वर्ग म्हणजे देश नसतो. देशामध्ये राहणारा, श्रमिक शेतकरी सामान्य माणूस सर्व स्त्री पुरुष मुलं मुली मिळून समाजविन बनतो आणि सर्व समाज मिळून देश बनतो.
👉🏻आज केवळ संविधान आहे म्हणूनच आपण सर्वजण किंवा भारत देश आनंदाने सुखाने आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर संविधानाचे रक्षण केले तरच संविधान आपले रक्षण करेल. म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या भारतीयांचे कर्तव्य आहे.
*Abraham Lincoln famously defined democracy as a government of the peple,by the people, for the people*
*अब्राहम लिंकन लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य अशी व्याख्या केली आहे*.परंतु जर असे झाले तर
*Democracy as a government off the people, buy the people, far the people*
म्हणजे लोकांचे नसलेले, खरेदी केलेले आणि लोकांपासून दूर असलेले असे राज्य झाले तर ती लोकशाही होऊ शकत नाही. म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान खूप महत्त्वाचे आहे. म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपले प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे...सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹🌹बंधुत्व प्रतिष्ठान. 🤝🌹
=================================================
===================================================================================================
========================≈========≈===============
==================================================
==================================================
==================================================
===================================================
===================================================
==================================================
==≈==============================================
==================≈==============================




















