⭕ *नगरपंचायत साठी १९१६९ मतदारांना मतदानाचा अधिकार - नगराध्यपद नामाप्र राखीव...*🔘

        ( वाशिम / मालेगाव प्रतिनिधी : अजय गायकवाड )

              [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१० सोमवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील २ डिसेंबर रोजी होणार नगरपंचायत च्या निवडणूकीत एकूण १९१६९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात ९६७५ पुरुष तर ९४९४ महीला मतदारांचा समावेश आहे, नवीन नगर पंचायतमध्ये ८ पुरुष तर ९ महिला उमेदवार असतील , यासाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागलेली आहे. मालेगाव नगरपंचायत साठी एकूण १७ प्रभाग असून त्यामध्ये एकुण १९१६९ मतदार नोंदल्या गेले आहेत. त्यामध्ये ९६७५ पुरुष तर ९४९४ मतदार हे महिला आहेत. मालेगाव नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे. प्रभाग नंबर १ मध्ये ७५४ मतदार असून हा प्रभाग एस टी साठी आरक्षीत आहे. प्रभाग नंबर २ मध्ये ८०९ मतदार असून हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्यामध्ये १०१६ मतदार आहेत. 

       प्रभाग नंबर ४ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून त्यामध्ये १०३४ मतदार आहेत. वार्ड नंबर ५ हा खुला असून त्यामध्ये १९२१ मतदार आहेत. प्रभाग नंबर ६ हा नामाप्र (ओबीसी) महिलेसाठी राखीव असून या वार्डात १०८९ मतदार आहेत. प्रभाग नंबर ७ मध्ये ७७२ मतदार असून हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग नंबर ८ हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून त्यामध्ये १५३६ मतदार आहेत. प्रभाग नंबर ९ हा खुल्या वर्गासाठी राखीव असून त्यामध्ये ७२६ मतदार आहेत. प्रभाग नंबर १० हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून त्यामध्ये ८०२ मतदार आहेत. प्रभाग नंबर ११ हा नामाप्र  महिलांसाठी राखीव असून त्यामध्ये १२११ मतदार आहेत. तसेच प्रभाग नंबर १२ हा नामाप्रसाठी राखीव असून त्यामध्ये ९८१ मतदार आहेत. प्रभाग नंबर १३ हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून त्यामध्ये १३०८ मतदार आहेत.

    प्रभाग नं १४ हा नामाप्र महिलांसाठी राखीव असून त्यामध्ये १४३७ मतदार आहेत. प्रभाग नंबर १५ हा ओबीसी साठी राखीव असून त्यामध्ये ११९६ मतदार आहेत. प्रभाग नंबर १६ हा सर्वसाधारण वर्गासाठी सुटला असून त्यामध्ये ९२५ मतदार आहेत. आणि प्रभाग नंबर १७ हा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असून यामध्ये १६५२ मतदार आहेत. सर्वात जास्त १९२१ मतदार हे प्रभाग क्र ५ मधे आहेत.तर सर्वात कमी ७२६ मतदार हे प्रभाग क्र ९ मधे आहेत. एकुण १७ प्रभाग असलेल्या मालेगाव शहरात एस टी प्रवर्गा साठी १ प्रभाग सुटला आहे. तर एस सी  साठी १ तर एस सी महिलांसाठी २ प्रभाग राखीव आहेत. ओबीसी साठी २ प्रभाग, नामाप्र महिलांसाठी ३ प्रभाग सुटले आहेत. तसेच खुल्या गटामधे एकुण ४ प्रभाग असुन खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ४ प्रभाग राखीव आहेत. यामध्ये  एकुण ८ प्रभागात पुरुष उमेदवार असणार आहेत. तर एकुण ९ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत. मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्याचे आवाहन तहसीलदार पुंडे यांनी केले आहे...

===================================================

Post a Comment

0 Comments