⭕ *संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, प्रगणे डांगरी येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न...*🔘



( अमळनेर तालुका/शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

                  [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:३० नोव्हेंबर रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर  तालुक्यातील खास बातमी प्रगणे डांगरी येथील संविधानाच्या 75व्या दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, प्रगणे डांगरी येथे अनुलोम संस्थेतर्फे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनुलोम संस्थेचे अमळनेर विधानसभा प्रमुख मनोहर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख, त्यातील मूलभूत तत्वे व हक्क यांची सविस्तर माहिती दिली.



         कार्यक्रमात बोलताना विरभूषण पाटील यांनी विद्यार्थ्यांनी संविधानाने दिलेल्या हक्कांबरोबरच आपली मूलभूत कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच आधुनिक युगात कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित करत “कौशल्यांशिवाय भविष्यात प्रगती साधता येणार नाही,” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.राकेश पवार सर यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे संवर्धन करावे, असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...

====================================================

Post a Comment

0 Comments