--------------------------------------------------------------------------
( सुरत शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ सुरत / सुरत ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ शुक्रवार :- सुरत जिल्ह्यातील शहरातील खास बातमी आज दिनांक १२ डिसेंबर रोजी बौधीसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर याची जयंती देशभरात साजरी करण्यात आली.भैय्या साहेब आबेडकर यांनी मुंबई दादर येथील चैत्यभूमी आणि नागपुर येथील दीक्षाभूमी सारख्या पवित्र स्थळांची निर्मिती करून आंबेडकरी चळवळीला अमर ठेवलं. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करून धम्मकार्याची व्यापक आणि सुसंघटित चळवळ देशभर उभी केली.
*आधुनिक विचारांचे धनी असदलेल्या भैय्यासाहेबांनी "बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस" सुरू केली; जनता आणि प्रबुद्ध भारत या चळवळीच्या अग्रगण्य मुखपत्रांचे व्यवस्थापन करून विचारप्रवाहाचे संरक्षण व विस्तार केला.*
*बाबासाहेबांनंतर धम्मदिक्षा चळवळीला नवं वेग देऊन, आंबेडकर सविचार गावागावात,* *पिढ्यान्पिढ्यांत पोहोचवण्याचं महान कार्य त्यांनी इतिहासात कोरलं.*
*आज आपल्या पिढीची जबाबदारी अधिक मोठी आहे—*
*या दुसऱ्या फळीतील महापुरुषांचे कार्य रुजवणे, त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या पुतळ्यांची निर्मिती हा पुढील लढ्याचा अजेंडा बनवणे!*
*इतिहासातील ही सुवर्णपाने गाळली जाऊ नयेत—हीच खरी कृतज्ञता!* सुरत शहरातील समस्त आबेडकरी समाज विविध क्षेत्रातील प्रमुख सामाजिक संगठनेचे कार्यकर्ता व धार्मिक संगठनेचे कार्यकर्ता यांचा कडुन भैय्यासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर याना कोटी कोटी वंदन..
*भैय्यासाहेब आंबेडकरांचा विजय असो!*
===================================================


