⭕ *आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थे तर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पवित्र चैत्यभूमी येथे स्वच्छता जनजागृती अभियान...*🔘


       ( धुळे / शिरपूर शहेर मानद प्रतिनिधी नरेंद्र रायसिंग ) 

                [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ धुळे  / शिरपूर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:११ डिसेंबर गुरुवार :- मुंबई विभागातील खास बातमी मुंबई विश्वरत्न विश्वभूषण , क्रांतीसुर्य , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महान पत्रकार , जलतज्ञ , अर्थतज्ञ , वीज निर्मितीचे जनक तसेच भारतीय रिझर्व बँकेचे जनक बोधिसत्व , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेतर्फे ' दादर येथील शिवाजी पार्क व पवित्र चैत्यभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आली.

         तसेच ' आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी या उपक्रमाद्वारे हजारो अनुयायांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. दरवर्षी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. तसेच चैत्यभूमी वर येणाऱ्या लाखो अनुयायींना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, तसेच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी 7 वाजे पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत सुरू झालेल्या या स्वच्छता जनजागृती अभियानात संस्थेचे अध्यक्ष - सन्माननीय बुद्धभूषण शिंदे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      महान पत्रकार बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला जनसमुहाला भोजनदान करणाऱ्या मंडळींचे कार्याची दखल घेऊन त्यांना आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरातील रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागांवर पडलेला कचरा, प्लास्टिक आणि इतर निर्माल्य गोळा केले. यावेळी 'स्वच्छता हाच संदेश', पर्यावरणाचे रक्षण करूया' व जनजागृती करूया अशा घोषणा देऊन समस्त नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष - बुद्धभूषण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,खान्देशातील सुप्रसिद्ध गितकार व गायक, कंपोजर - नरेंद्र रायसिंग यांनी आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेचा आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छभूमी या उपक्रमावर आधारित गाण तयार करून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली आदरांजली वाहिली व त्यांचे रमाई प्रोडक्शन शिरपूर या यूट्यूब चॅनेल वरती गाण सुद्धा प्रकाशित झाले आहे , तसेच बॅरिस्टर " डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणासोबतच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते.

         त्यांच्या या प्रवित्र महापरिनिर्वाण दिनी केवळ अभिवादन न करता, प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. चैत्यभूमी ही आपल्या सर्वांसाठी पवित्र भूमी आहे, तिची स्वच्छता राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे." तसेच चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला जनसमूह व नेते मंडळी तसेच भोजनदान करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ' आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छभूमी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

=====================================================

Post a Comment

0 Comments