(अकोला:जानोरी मेळ प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / बाळापूर ( लोकतक समाचार न्युज प्रतिनिधी ) दिनांक:२८ जुलै रविवार:- अकोला जिल्ह्य़ातील बाळापुर तालुक्यातील मोखा येथील श्री संत सखाराम महाराज व परमहंस रामचंद्र महाराज यांच्या कृपेने अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी 25 वर्षांपूर्वी जो शालेय वटवृक्ष लावला त्याचे औचित्य व त्यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून व्यायाम शाळेचे व विद्यार्थी वर्ग व पालकांचा गुणगौरव व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उद्घाटन मूर्ती सतीशचंद्र भट सर जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला तसेच बाळापूरचे तहसीलदार वैभव फरताडे गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके मॅडम जेष्ठ शिक्षणाधिकारी गौतम बडवे साहेब लोहारा मदरशा अध्यक्ष बाजी देशमुख विद्युत वितरण कंपनी कारंजा निंबा फाटा चे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद भोसले साहेब श्री गजानन क्लिनिक निंबा चे प्रमुख डॉक्टर अमित देशमुख सुद्धा उपस्थित होते तसेच बाळापूर पंचायत समिती सभापती पती रामकृष्ण सोनटक्के पंचायत समिती वझेगावच्या इंदुताई वानखडे ह्या सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या सदस्य अर्चनाताई देशमुख श्री संत सखाराम महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत कौलकर शिक्षक वृंद रामचंद्र महाराज इंग्लिश स्कूल चे सर्व कर्मचारी शिक्षक वृंद बबलू भाऊ देशमुख यांच्या मातोश्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई देशमुख गणेश कुमकर दादाराव वानखडे नाना तायडे जानोरी मेळ वझेगाव स्वरूप खेळ काझी खेळ दगड खेळ नागद सागत निंबा निंबी हिंगणा इत्यादी गावातील सरपंच पोलीस पाटील उपसरपंच विद्यार्थी वर्ग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला सर्व परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शाळेचा फोटो सप्रेम भेट देण्यात आला तसेच सन्मानचिन्ह सुद्धा देण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कौलकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरसाट सर यांनी केले या कार्य कार्यक्रमांमध्ये आपल्या विशेष शैलीमध्ये दादाराव वानखडे यांनी बबलू भाऊ देशमुख यांचे भरभरून कौतुक केले व त्यांनी लावलेल्या शालेय वटवृक्षाचे रूपांतर एका भल्या मोठ्या वटवृक्षात झाले त्याबद्दल या परिसरातील सर्व विद्यार्थी वर्ग व सर्व पालक वर्ग भारावून गेलेले आहेत व त्यांच्या हातून अशाच प्रकारचे खूप मोठे कार्य घडो अशा त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शाळेच्या रोपे महोत्सवाच्या दिवशी आपल्या विशेष शैलीतून सांगितले सर्व गावातून आलेले विद्यार्थी वर्ग पालक व प्रमुख पाहुणे यांना भोजन सुद्धा शाळेतर्फे देण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला


