( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ जुलै रविवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव दिनांक 23 जून रोजी पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात काँग्रेस कमिटी वाशिम जिल्हा निरीक्षक देवानंदजी पवार, काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित भाऊ झनक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप भाऊ सरनाईक यांनी मेडशी येथील धडाडीचे कार्यकर्ते संजय विष्णू भागवत. (नेते )हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व अमित झनक व झनक घराण्याचे एकनिष्ठ धडाडीचे कार्यकर्ते आहेत यांच्या या कार्याची पावती म्हणून संजय भागवत यांची काँग्रेस पक्षाच्या तालुका उपध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्याबद्दल मेडशी येथे संकट मोचन मित्र मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल भागवत, धन्नू भवानीवाले, संतोष बबन तायडे,जावेद धन्नू भवानीवाले,जगदीश राठोड, नितीन कुदळे, शुभम यादव. शिवम बहादुरे,अंतुल राठोड इत्यादी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
