*ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या व गावकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण उपक्रम राबवला...*



   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

 जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दिनांक: १० ऑगस्ट शनिवार  :- जळगाव जिल्ह्या अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात स्व. आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत दिनांक 10 रोजी एक मोठे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला. या उपक्रमात गावात सुमारे 400 रोपे लावून हिरवळीची चादर पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, कृ उ बा स चे सभापती मा. अशोक पाटील नर्मदा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संचालक डॉ. अनिल शिंदे, तसेच ,श्री धनगर दला पाटील , श्री जिभाऊ सुभाष पाटील या मान्यवरांच्या व गावकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि गावचे माजी सरपंच मनोहर पाटील यांनी सर्व ग्रामस्थांना समोर प्रतिष्ठान मार्फत 400 वृक्षांचे रोपण करणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली, गावातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.या कार्यक्रमात सरपंच मीनल कोळी, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका श्री दादासो हिम्मतराव पाटील, श्री डॉ. अशोक पाटील श्री डॉ. सुनिल चोरडिया, श्री हिरालाल सोनवणे, श्री भानुदास पाटील श्री कैलाश पाटील, श्री सखाराम आबा, श्री रवींद्र पाटील, श्री प्रवीण पाटील श्री रामचंद्र पाटील,श्री समाधान पाटील श्री शुभम सोनवणे श्री स्वप्नील पाटील, श्री जगदीश पाटील, श्री चेतन पाटील, श्री गबा भाऊसाहेब, आरीफ दादा, श्री योगेश वानखेडे चि. आकाश सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.स्व. आबा साहेब किसन पाटील प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे मांडळ गावात हिरवळीचे प्रमाण वाढणार असून पर्यावरण, जतन , संरक्षणासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवल्याची भावना समस्त गावकऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments