( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: ११ ऑगस्ट रविवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी भिसडे ते मुन्नास पिंपरी या रस्त्यावर खड्डेच- खड्डे झाले असून हा रस्ता विदर्भ- मराठवाड्याला जोडणारा असून या रस्त्याने मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीच्या मालाचे वाहन घेऊन रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी न्यावा लागतो परंतु मन्नास पिंपरी ते कोयाळी भिसडे हा रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्याने वाहन चालवणे कठीण आहे वेळो-वेळी वाहन फसते त्यामुळे या रस्त्याने शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी वाशिम किंवा रिसोडला मालाचे वाहन घेऊन जाता येत नाही. याच रस्त्याने मन्नासपिंपरी येथील विद्यार्थ्यांना कोयाळी भिसडे येथील श्री शिवाजी विद्यालय व महाविद्यालयात दररोज ये-जा करावे लागते हा रस्ता चिखलमय झाला असून जागोजागी खड्डेच- खड्डे पडल्याने या रस्त्याने पैदल यावे लागते. विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना खूपच त्रास होत आहे. तरी याबाबतची दखल लोकप्रतिनिधी,वाशिम सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी या बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या ,विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्याची सुधारणा करावी अशी शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची मागणी आहे.


