*ॲड ललिता पाटील यांच्यामार्फत हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र व फुलहार अर्पण करून अभिवादन...*




( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

 जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दिनांक: १२ ऑगस्ट सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप मार्फत क्रांती दिन व आदिवासी दिवस निमित्त अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना सालाबादप्रमाणे पुष्पचक्र व फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अमळनेर शहरातील तहसील कार्यालय आवारतील हुतात्मा स्मारक साने गुरुजी पुतळा समशेर पारधी स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राणी लक्ष्मीबाई चौकातील लाल बावटा स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पैलाड नाका येथील हुतात्मा स्मारक अहिल्याबाई होळकर स्मारक महाराणा प्रताप स्मारक अण्णाभाऊ साठे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांतीज्योती महात्मा फुले स्मारक या सर्व स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले वसुंधरा लांडगे यांच्या सुरेल आवाजात प्रत्येक स्मारकाजवळ देशभक्तीपर गीत क्रांती गीत व समर गीत गाऊन वशिष्ठ्यपूर्ण श्रद्धांजली वाहत अभिवादन केले या कार्यक्रम प्रसंगी फिनिक्स ग्रुप अध्यक्षा ॲड ललिता पाटील वसुंधरा लांडगे मॅडम डॉ प्रतिभा मराठे अनिता पाटील सुचिता पाटील नीताताई शिरसाठ प्राचार्य आशिष शर्मा पन्नालाल मावळे नितीन पाटील भटू पाटील समाधान पाटील ईश्वर नागे गोरख बाविस्कर उमेश पाटील दिपक मोरे महाराज अनेक मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments