( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक : ०४ ऑगस्ट रविवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथील अशोक नगर तक्षशिला बौद्ध विहार येथे श्रीलंकेतील बौद्ध अर्हत भिक्षूच्या अस्थी कलश हे श्रीलंके वरून नागपूरला नेत असताना महाराष्ट्र उपाध्यक्ष धम्मकाया मिशन मनोज सावळे यांचे अथक परिश्रमाने आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आज आणलेल्या अस्थी कलश ला बुद्ध बांधवांनी केले वंदन तसेच उपासक आणि उपसिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अस्थी कलश शोभा यात्रा मालेगांव नवीन बसस्थानक परिसरातील तहसील ते तहसील मागील विर भगतसिग चौक ते तक्षशिला बुद्ध विहार.4 ऑगस्ट दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेल चित्र पासून ह्या अस्थी कलश ची प्रथम भव्य शोभा यात्रा करण्यात आली. त्या अस्थी कलश च्या मध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या अर्हत झालेल्या भिक्षू यांच्या पवित्र अस्थी कलश श्रीलंकेवरून भिक्षू धम्म सुगत बोधी श्रीलंका यांचे अशोक नगर येथील तक्षशिला बौद्ध विहार येथे ठेवून सर्व बौद्ध बांधवांनी ह्या अस्थी कलश ला वंदन केले. उपस्थित तक्षशिला बुद्ध विहारांचे बौद्धचार्य कैलास इंगळे,दीपक घुगे, भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार प्रमुख हरिश्चंद्र पोफळे, रंजन घुगे, यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मकाया मिशन राहुल तायडे,विनोद गायकवाड, लीलाधर चक्रनारायण, रमेश तायडे, सुरेंद्र कांबळे, प्रदीप अवचार, आनंद इंगळे,मोठ्या अस्थी दर्शनाचा लाभ घेण्याचे नियोजन केले होते. सुरुवातीला मुंबईचे पी.एस.आय. मोरे यांनी प्रास्ताविक तर जे.एस.शिंदे यांनी सूत्रसंचालन तर मनोज सावळे यांनी आभार मानले.या वेळी अंधार सावंगी येथील पूज्य भदंत उपाली यांनी त्रिशरण पंचशील उपस्थितांना सादर केले. मग हाडांचे काय? भंतेजींच्या अस्थी आणलेल्या कलशात बुद्धकालीन पूज्य भन्ते राहुल (बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांचे पुत्र), पूज्य भन्ते सारिपुत्त (पूज्य भगवान बुद्धांचे प्रारंभिक शिष्य), पूज्य भन्ते अंगुलीमल, पूज्य भन्ते यांच्या पुढील पवित्र अस्थी होत्या. बकुल आणि इतर काही अर्हत पूज्य भन्ते श्रीलंकेतून आणले होते. प्राप्त झाल्याचे सांगितले सकाळी सर्वप्रथम भंते धम्मसुगत यांनी सुचवलेल्या तर सुधाकर पखाले यांनी डॉ.बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात केली. यांचे उपस्थित श्रीलंकेतील धम्म सुगत बोधी भिक्षू यांनी आणलेल्या अस्थी कलश ला बौद्ध बांधवांनी केले वंदन.


